Posts

Showing posts from March, 2021

यशाची गुरुकिल्ली

     सोनू, चिनू आणि राजू तीन मित्र एकाच शाळेत शिकत असतात. तिघंही खूप हुशार असतात. ते तिघं यावर्षी वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा निश्चय करतात आणि त्यानुसार अभ्यासाला लागतात. सोनूने आपल्या वर्षभराच्या अभ्यासाचं वेळापत्रक बनवलेलं असतं आणि ते परीक्षा होईपर्यंत कटाक्षाने पाळतो. रात्रीची थोडीशी झोप आणि शाळेची वेळ सोडल्यास त्याचा सर्व वेळ हा विविध विषयाचा अभ्यास करण्यात जाई. खेळणं, टीव्ही पाहाणं, नातेवाईकांना भेटणं हे सर्व त्यांनी त्यावर्षासाठी बंद केलेलं असतं. जेवताना देखील तो अभ्यासाचं पुस्तक वाचत असे.     चिनूने देखील वर्षभर आपण अभ्यास कसा करायचा हे निश्चित केलं होतं. मन आणि शरीर निरोगी राहाण्यासाठी त्यांनी एका योग शिक्षकाकडून काही योगासनं शिकून घेतली होती. पहाटे लवकर उठून तो योगासनं आणि व्यायाम करायचा. तो अंघोळ, नाश्ता उरकून शाळेची वेळ होईपर्यंत अभ्यास करायचा. संध्याकाळी बाहेर फिरायला गेल्यावर अभ्यासाशिवाय इतर विषयांवर मित्रांशी गप्पा मारत असे. कुठेही न रेंगाळता घरी परत येई. त्याशिवाय एखाद्या रविवारी चांगला चित्रपट देखील पाहात असे. त्याच्यासाठी अभ्य...

बोधकथा

  बढाईखोर माणूस एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले. तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही. Ref: marathibodhkatha

वाईट विचारांचे दहन

  होळी” ……. मनुष्याच्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. माणसाच्या जीवनामधे त्याला आयुष्यातील अनेक रंगछटा अनुभवायला मिळतात, सुख -दुख, चांगलं -वाईट, यश – अपयश अशा अनेक प्रसंगातून जीवन पुढे जात असते, शिशिरातील पानगळ संपून चैत्रातील नव्या फुटणाऱ्या पालवीप्रमाणे, माझ्या जीवनातील नकारात्मक घटना आणि विचारांची होळी करून जीवनात नवीन सकारात्मक यश निर्माण करायचे आहे. मागचे सर्व मनातून स्वच्छ करून नव्या जोमाने नवीन दिवसाला सामोरे जायचे आहे. माझेही आयुष्य विविध रंगछटांच्या प्रसंगाने भरलेलं आहे, उगवती आणि मावळतीचा रंग जरी केशरी असला तरीही दोन्ही रंगातील तेज वेगवेगळ आहे, जसे समुद्राच्या पाण्याचे विविध रंग वेगवेगळ्या क्षणांमधे आपण अनुभवतो तसेच अवकाशाचे अनेक रंग प्रत्येक दिवशी अनुभवत असतो. रोजचे आकाश आणि त्याचा रंग काही वेगळाच असतो. जीवन हे विविधतेने नटलेलं आहे. जसे अन्न सेवन करतांना मला सगळे रस रंग रूप हवेसे वाटतात, तसेच जीवनातील प्रत्येक प्रसंगातून मला हवा असले...

समाधान

गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो....  कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो....  अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो आणि खालच्या टरफलांमध्ये गायब होतो...... आपण मग तो बोटाने शोधायला सुरूवात करतो......  अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया,  पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो,  थोडेसे तरी वैतागतो..... या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.....  *आयुष्याचेदेखील* असेच आहे का ?? ?  पाटीभर *आनंद* शेजारी असूनही,    आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....  पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....          आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते.....  *आयुष्य खूप सुंदर आहे....त्याला अनुभवा...गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा...*    *समाधान हेच आनंदी राहण्याचे सुत्र आहे* 

गरज आत्मविश्लेषणाची

       स्वतःच्या वर्तनाचे, कृतींच्या परिणामांचे, विचारव्यूहाचे वस्तुनिष्ठ दृष्टीने विश्लेषण करा. त्यातून स्वतःच्या क्षमतांची व स्वत:च्या वर्तनाचे, कृतीच्या परिणामांचे, विचारव्यूहांचे मर्यादांची जाणीव होईल. व्यक्तीला स्वत:चे गुण व बलस्थाने समजली तर स्वत:ची उद्दिष्टे चांगल्या प्रकारे साध्य करता येतात. प्रगती करता येते. त्यामुळे जीवनातील समाधान वाढते. समाधान ' हा अनुभव व्यक्तिसापेक्ष असतो आणि मन:स्वास्थ्य वाढविण्यास तो उपयुक्त असतो. कोणी गरिबीतही समाधानी असतो तर कोणी भरपूर पैसा, ऐषारामाची साधने असूनही असमाधानी असतो. चांगले शिक्षण, चांगली नोकरी, आधार देणारे मित्र व पालक असणाऱ्या व्यक्ती वास्तविक समाधानी असल्या पाहिजेत, पण त्यातील काही विशिष्ट, उच्च अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून असमाधानी असतात. व्यक्तीला आयुष्यात समाधान मिळवायचे असेल तर तसा विचार व्यक्तीने वारंवार करणे आवश्यक असते. स्वत:ची तुलना इतरांशी करून दुःखी होऊ नये. इतरांपेक्षा माझ्याकडे काय जास्त आहे याचा विचार करण्यापेक्षा मी दुसऱ्यांसाठी काय करू शकतो याचा विचार करावा. दुसऱ्यासाठी काम करण्यात ( त्यागात ) मोठे सम...

पुस्तक वाचनाचे महत्व

 *📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?* १) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो. २) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते. 3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो. ४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते. ५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते. ६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते. ७) आई वडीलांची किंमत कळायला लागते. ८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो. ९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात. १०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते. ११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते. १२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते. १३) या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट ह...

एक छान वाचण्यात आलेला लेख

 गावच्या जत्रेत एक ५ वर्षाचं मूल आपल्या बाबांबरोबर फिरत होतं.🤗🤗 जत्रेतली लायटिंग, खेळणी, खाऊ बघून प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी बाबांकडे हट्ट करू लागलं. बाबांकडे त्यानं बॅट मागितली, बाबांनी ती घेतली आणि पिशवीत टाकली.  पण त्याने हट्ट केला "बाबा.. माझ्याकले द्या". बाबांनी दिली.😊😊 पुन्हा पुढं गेल्यावर त्याला खेळण्यातली ढोलकी दिसली. बाबांनी घेतली आणि त्यांच्या पिशवीत टाकली. आणि पून्हा मुलानं, " बाबा...मला दया". बाबांनी दिली. जरा पुढे गेल्यावर मुलानं खायला मागितलं. बाबांनी एक वेफर्सचं पॅकेट घेऊन त्याला दिलं.  एव्हाना त्याचे दोन्ही हात भरले होते.  बाबांनी त्याच्याकडे असलेली खेळणी पिशवीत ठेवायला मागितली पण त्याने नाही दिली.😥😥 पुढे आणखी फिरल्यावर त्याला आईस्क्रीम दिसलं. हट्ट करून त्याने ते सुद्धा घेतलं. पण हातातल्या इतर गोष्टी त्याला सोडवत नव्हत्या. 😯 दोन्ही हात भरल्यावर मात्र बाबांचा हात सोडून तो चालू लागला.  एका हाताने खेळणी सांभाळत आणि दुसऱ्या हातात असलेलं आईस्क्रीम खाता खाता तो बाबांपासून कधी दूर जात हरवला ते त्यालाही नाही कळलं आणि बाबांनाही. त्या गर्दीत बाबा कुठ...

सदोष व्यक्तिमत्त्वाचे विविध प्रकार

वर दिलेले गंभीर किंवा साधारण मनोविकाराचे इतर ठळक प्रकार आहेत. याशिवाय अनेक प्रकारचे व्यक्तिमत्त्वाचे दोष आढळतात. यांतले बरेच प्रकार आपण आजूबाजूच्या लोकांमध्ये पाहत असतो. यात उपचार करावाच असे फारसे काही नसते. किरकोळ गोष्ट व स्वभावाचा दोष म्हणून आपण ते सोडूनही देतो. यातले बरेच पैलू सौम्य स्वरूपात सर्रास आढळतात, फक्त ते जास्त तीव्रतेने आढळले तरच त्याला आपण दोष मानतो. यांतले काही प्रकार आता आपण पाहू या. संशयग्रस्त स्वभाव आजूबाजूच्या लोकांवर अविश्वास, सतत संशयीपणा, कोणीतरी आपल्यावर कटकारस्थान करीत आहे अशी खात्री, ही या प्रकाराची वैशिष्टये असतात. अशा पूर्वग्रहदूषित व्यक्ती कोणाशीही दिलखुलासपणे वागू शकत नाहीत. अंतर्मुख स्वभाव या प्रकारच्या व्यक्तींचे इतरांशी संबंध जुळणे अगदी कठीण असते. अशा व्यक्ती एकलकोंडया, हातचे राखून बोलणा-या, एकमार्गी, छंदिष्ट आणि थंड वाटतात. यांचे निर्णय पक्के नसतात, पण या प्रकारात संशयग्रस्तता नसते. आत्मकेंद्री स्वभाव या व्यक्तींना स्वतःबद्दल अवास्तव अभिमान असतो व स्वतःच्या सामर्थ्याबद्दल अवास्तव कल्पना असतात. सर्वांचे लक्ष आपल्याकडे असावे असा त्यांचा प्रयत्न असतो. जेव्...

सिंहावलोकन

सिंहावलोकन हा शब्द दोन शब्दांना जोडून तयार होतो. एक म्हणजे सिंह आणि दुसरा म्हणजे अवलोकन. अवलोकन करणे म्हणजे पाठीमागे झालेल्या गोष्टींचा पाठपुरावा करणे व झालेल्या गोष्टींकडे मागे वळून पाहणे. सिंहावलोकन म्हणजे सिंहाप्रमाणे मागे पाहून मागच्या कारकीर्दीवर नजर टाकणे. आपल्या आयुष्यात आपण सुद्धा एका निरंतर वाहणाऱ्या नदी सारखे वाहतो. अडथळे येतात, संकटे येतात कधी आपणच अडचणींचे लक्ष ठरतो. पण आयुष्यात पुढे चालायचे असेल तर हे सिंहावलोकन करता आले पाहिजे. ते करताना बरेचदा न पाहलेल्या, न जाणवलेल्या किंवा न समजलेल्या गोष्टी, त्यांची खोली किंवा त्याचा न कळलेला अर्थ नव्याने समजू लागतो. आपल्याला जाणवणाऱ्या मागच्या प्रवासातील गोष्टी कधी गर्द आणि अनाकलनीय वाटू लागतात, वेळेनुसार एका अशांत सागरा समान गलबल उठवतात, अस्थिर झालेल्या मनाला निराशा आणि नकारात्मक दिशेला घेऊन जातात पण खरं सांगायचं तर हीच ती वेळ असते स्वतःला स्वतःची सोबत करण्याची. आपण रोज आरशात पाहतो, सजतो आणि सजवतो पण तेव्हा बाह्य रंगोटी मधून जेवढा आनंद मिळत नाही जेवढा हा सिंहावलोकन करताना मिळतो. आपल्यातले एक एक कंगोरे आणि स्वतःला शोधण्याचा निखळ आनंद...

नकारात्मक प्रभाव

असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते. एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो, पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो?  आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,  कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,  का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं? का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?   तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे, आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..     तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीन...

विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

Image
विद्यार्थिनींनीनो,  जून महिना उजाडला की धावपळ सुरू होते ती शासकीय व शैक्षणिक कामासाठी लागणारी विविध दाखले काढण्याची. बरेचवेळा आपणास विविध दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे माहीत नसल्यामुळे आपली खूप दमछाक होते. इ सेवा केंद्र, सेतू कार्यालयामध्ये खूप वेळा फेऱ्या माराव्या लागतात. काहीजण तर योग्य माहिती नसल्याने दाखले काढण्याचा विचार सोडून देतात. जर आपणास दाखले काढण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे माहीत असतील तर आपण एकाच प्रयत्नात सर्व ती पूर्तता करून अर्ज जमा करू शकता. त्यामुळे खालील छायाचित्रातून विविध शासकीय व शैक्षणिक कामी लागणारी विविध कागदपत्रे अवगत करून देत आहोत. 

सहजप्रवृत्ती

 मानवी शरीरात प्रगट होणाऱ्या चौदा सहजप्रवृत्ती खालीलप्रमाणे आहेत. त्यापुढे त्यामूळे उत्पन्न होणाऱ्या भावना त्या सहजप्रवृत्तीचे पुढे दिल्या आहेत.- विमोचन प्रवृत्ती- भीती युद्ध प्रवृत्ती - राग जुगुप्सा प्रवृत्ती - तिटकारा वात्सल्य प्रवृत्ती - मृदुभाव याचना प्रवृत्ती - आर्तभाव संभोग प्रवृत्ती - कामभाव आत्मसमर्पण प्रवृत्ती -हीनभाव जिज्ञासा प्रवृत्ती - आश्चर्य आत्मविधान प्रवृत्ती - अहंभाव संध प्रवृत्ती - एकाकीभाव अन्नसंशोधन प्रवृत्ती - क्षुधा निर्माण प्रवृत्ती - कर्तुभाव संपादन प्रवृत्ती - स्वाम्यभाव (स्वामीत्व किंवा श्रेष्ठ असण्याची भावना) हास्य प्रवृत्ती - विनोदभाव (संदर्भ : विकिपीडिया)

सुख म्हणजे काय?

सुख म्हणजे काय? दोन परंपरा ( What is Happiness ? Two Traditions )  आपले कसे चालले आहे ? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिगत व अनेक पद्धतीने आपणास देता येते . चांगले जीवन म्हणजे काय ? सुख म्हणजे काय ? समाधानकारक जीवनाची व्याख्या काय आहे ? चांगले जीवन जगणे म्हणजे काय ? कोणत्या प्रकारच्या जीवनाचे आपणास मार्गदर्शन करावे असे वाटते ? लोक मला कसे आठवू शकतील ? इत्यादी प्रश्नांचे नेमके उत्तर आपणास हवे आहे.  १. विलासी सुख ( Hedonic Happiness )  विलासी सुखाता सुखासक्ती सुख, ऐहिक सुख किंवा भौतिक सुख या नावानेही ओळखले जाते. विशेषतः बिलासी सुख हे इंद्रियजन्य सुख समजले जाते. सुख हेच अंतिम ध्येय असा विचारप्रवाह या सुखामध्ये मोडतो. आपल्यापैकी प्रत्येकजण दीर्घायुष्याची आशा बाळगत असतो. अपरिपक्वनामुळे एखाद्याचा शेवट होत नाही, ' आत्महत्या ' या संकल्पनेद्वारे आपणाला जीवनातील संख्यात्मकतेऐवजी जीवनातील गुणात्मकता अधिक महत्त्वाची वाटते. गुणात्मक जीवनामध्ये हर्ष / आनंद फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण हर्षभरीत ( आनंदी ) आणि समाधानी जीवन जगण्याची आशा करतो. अशी आशा बाळगण्यानेच आपल्यातील चांगल्या गोष्टी आणि...

समतोल विकासाचा मार्ग

      निसर्गाच्या चक्रात जगतांना स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं ही काळाची गरज बनली आहे. किंबहुना स्वयंविकासासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु या विकासाच्या प्रवासात बहुतांशजण अर्ध्यापर्यंतही पोहोचू शकत नसल्याचे दिसून आले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वातील गुण-दोष. स्वयंविकासातील हे अडथळे दूर कसे करायचे हे पाहूया या लेखमालेमध्ये       सर्वांगिण विकास ही संकल्पना आज अनेक ठिकाणी आपल्याला दिसत आहे. स्वत:चा विकास साधण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला जात आहे. परंतु दुर्देवाने हा विकास केवळ वरवरच्या स्वरुपात दिसून येत आहे. अंतर्बाह्य विकासाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्यामुळे आज मानसिकदृष्ट्या कमकुवत पिढी निर्माण होऊ लागली आहे. माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक व्यक्तींच्या जीवनात विकासाचा असमतोल झाल्यानेच अनेक समस्या निर्माण झाल्याचे आजवरच्या अभ्यासातून लक्षात आले आहे. एखादा मुलगा फारच चतुर, धूर्त असतो. कुणी पटकन निर्णय घेणारा असतो. कुणी फारच भोळा, गरीब असतो. हे गुण काही शंभर टक्के उपजात नसतात. तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, घरातील वातावर...

मानसिक डाएट

    मानसिक डाएट ही संकल्पना जरा नविन आहे, पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे *"तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो"*  मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का?बघू या. मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल.. स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते. मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.  तर *मानसिक डाएट* म्हणजे काय करायचं  तरं आपले विचार आधिकाधीक *फिल्टर्ड* कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा, *तेलकट-तुपकट* म्हणजे *फडतुस-निगेटिव्ह विचार* आपण करणार नाही,  *अती-गोड* म्हणजेच स्वत:च्या आनंदात *दुसर्याला विसरुन जाणारे विचार* आपण जवळ येऊ देणार नाही. दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु, *दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकुन देऊ,* आठवड्यातुन एकदा तरी *साध्या विचारांची* खिचडी-कढी खाऊ या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते *स्वातंत्र्य आणि स्वैराचार* यातला फरकं ओळखुन स्वत:ला *"रीझनेबल"* बनवणं, दुसर्...

समाजाने आता बदललेच पाहिजे

*Point 18 be noted* १.  पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा.* २.   कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा. ३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा. ४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा. ५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील. ६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा.  ७. मोडेल पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम) 8 आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झालेय. आता ही परिस्थिती बदला, चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या अनेक पिढ्...

जीवन कौशल्ये

Image
  आजच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. ह्या बदलांमुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दडपला गेला आहे. त्यामुळे स्वत:ला समजून घेण्याची क्षमता विकसित होण्यास त्यास अडसर निर्माण होत आहे. व्यक्तिचा सर्वांगिण विकास करणे हे शिक्षणाचे अंतीम उद्दिष्ट मानले जाते. त्या सर्वांगिण विकासामध्ये मानसिक क्षमतांचा जास्तीत जास्त उपयोग करून शिक्षण अधिकाधिक जीवनकेंद्रित करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधता येतो. व्यक्तिविकास हा चारित्र्यनिर्मितीशी निगडीत असतो. चारित्र्याची उत्तमप्रकारे जडणघडण होण्यासाठी मानवाला महत्त्वपूर्ण जीवन कौशल्यांची आवश्यकता आहे. म्हणूनच जीवन कौशल्यांचा विकास शिक्षणातून होणे गरजेचे आहे. यास मानसशास्त्रीय कौशल्य (Psychological Skill) म्हणूनही ओळखले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने १९९९ मध्ये पुढील दहा जीवन कौशल्यांचा पुरस्कार केला : ‘स्व’ची जाणीव :  व्यक्तीची स्वत:च्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याची क्षमता म्हणजे ‘स्व’ची जाणीव. या क...

फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअर

        फॅशन आणि स्टाईल या बाबतीत आजकाल सगळ्याच वयोगटातील लोक जागृत आहेत. फॅशन क्षेत्रातील झगमगत्या जगाचे आकर्षण अनेकांना असते. बऱ्याचदा टी.व्हीवर रॅम्पवर आकर्षक पोशाखासाहित चालणारे मान्यवर आपण पाहतो. या सगळ्या नाविन्यपूर्ण आणि आकर्षक कपड्यांची डिझायनिंग डिझायनरने केलेली असते. हे जग खूप अद्भुत आणि विस्तारत जाणारे आहे. केवळ कपडे शिवणे हा त्याचा भाग नसून त्याच्या पलीकडेही या क्षेत्राचा आवाका आहे. टाके, टीपा, डिझायन, प्रत्यक्ष शिवणकाम, रंगसंगती, कपड्यावरील जरीकाम, आकर्षक कलाकुसर या बाबींचा त्यात समावेश असतो. आपला देश संस्कृती आणि परंपरा जपणारा आहे. जुन्या काळातील वेशभूषा नवे रुप, नवं रुपडं धारण करून पुन्हा बाजारात येत आहेत. या क्षेत्रात नव्या कल्पनांना, सर्जनशीलतेला वाव आहे. अनेक नामांकित व्यक्ती, नेते, अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक, तरुणाई हे सर्वच आपल्या दिसण्याबद्दल जागरूक असतात. आजकाल अनेक कंपन्या आपल्याला हवा तसा पेहराव डिझायनही करून देतात. देशात अनेक नामांकित डिझायनर आहेत. ते सतत नव्या बदलानुसार पेहराव तयार करत असतात. भारतीय पेहराव, पाश्चिमात्य पेहराव काळानुसार बदलत...

ई-कॉमर्स म्हणजे काय?

  ई-कॉमर्स  ई-कॉमर्स (ज्याला इलेक्ट्रॉनिक कॉमर्स देखील म्हणतात) ही उत्पादने किंवा सेवांची खरेदी-विक्री, पैशाचे हस्तांतरण आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे (इंटरनेट) डेटा ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया आहे. हे नेटवर्क लोकांना अंतर आणि वेळेच्या बंधनाशिवाय व्यवसाय करण्यास अनुमती देते. ई-कॉमर्स व्यवसायाचे प्रकार विविध प्रकारचे आहेत  ई-कॉमर्स व्यवसाय पर्याय  आपण आपल्या प्राधान्ये, भांडवल आणि ऑनलाइन व्यवसाय मॉडेलवर आधारित निवडून घेऊ शकता. विविध व्यवसायांसाठी आपल्याला विविध तंत्र आणि रणनीती लागू करणे आवश्यक आहे. काही आवडत्या ऑनलाइन कंपन्यांमध्ये हे समाविष्ट आहे: B2B व्यवसाय बीएक्सएनएक्ससी व्यवसाय संलग्न विपणन व्यवसाय गूगल अ‍ॅडवर्ड्स मार्केटिंग ऑनलाइन लिलाव विक्री वेब विपणन ई-कॉमर्स व्यवसाय कसे कार्य करतात? ऑनलाईन व्यवसाय एक समान तत्त्वांवर बरेच कार्य करते  ऑफलाइन / किरकोळ दुकान  करते. विस्तृत स्तरावर, संपूर्ण ईकॉमर्स प्रक्रिया तीन मुख्य घटकांमध्ये किंवा कार्य प्रक्रियेत मोडली जाऊ शकते: ऑर्डर प्राप्त करणे ही पहिली पायरी आहे जिथे ग्राहक ईकॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे वेबसाइट (...

जागतिक महिला दिन विशेष लेख

     सकाळी सकाळी वर्तमानपत्र उघडा, एक तरी बातमी निश्‍चितपणे वाचायला मिळेल- बलात्कार, अत्याचार, हुंडाबळी. मग असा प्रश्‍न पडतो की, २१ व्या शतकात कित्येक क्षेत्रांमध्ये महिलांनी भरारी मारलेली आहे, अशा या समाजात अशा घटना राजरोसपणे कशा घडू शकतात? मग वाटतं, या शतकातसुद्धा महिला खरेच सक्षम आहेत? सशक्त आहेत? आमची नारीशक्ती कुठे दिसतेय? याचं उत्तर खेदानं ‘नाही’ असंच द्यावं लागेल. म्हणजे या पुरोगामी समाजात खर्‍या अर्थाने स्त्री सशक्त किंवा सक्षम झालेलीच नाहीय. आता सक्षम होणं किंवा स्त्री-सशक्तीकरण होणं म्हणजे नक्की काय हा एक प्रश्‍नच आहे. याचा विचार अनेक पैलूंनी करावा लागेल. कारण ‘स्त्री-सशक्तीकरण’ या शब्दाची व्याप्तीच खूप मोठी आहे. स्त्रीचं शारीरिक आणि शैक्षणिक सबलीकरण, आर्थिक सबलीकरण, वैचारिक सशक्तीकरण आणि सामाजिक सशक्तीकरण या सगळ्या पैलूंनी स्त्री जेव्हा सशक्त होते आणि त्याचा उपयोग सकारात्मक दृष्टीने समाजासाठी केला जातो तेव्हाच खर्‍या अर्थाने स्त्रीचं सशक्तीकरण, सक्षमीकरण झालं असं म्हणता येईल. आता थोडंसं जुन्या काळाकडं वळून बघूया आणि स्त्रीशक्तीच्या एकेक पैलूचा विचार करूया. ...