मानसिक डाएट

  

मानसिक डाएट ही संकल्पना जरा नविन आहे,

पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे

*"तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो"*  मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का?बघू या.

मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल..


स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते.

मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते. 

तर *मानसिक डाएट* म्हणजे काय करायचं 

तरं आपले विचार आधिकाधीक *फिल्टर्ड* कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,


*तेलकट-तुपकट* म्हणजे *फडतुस-निगेटिव्ह विचार* आपण करणार नाही, 


*अती-गोड* म्हणजेच स्वत:च्या आनंदात *दुसर्याला विसरुन जाणारे विचार* आपण जवळ येऊ देणार नाही.


दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु,


*दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकुन देऊ,*


आठवड्यातुन एकदा तरी *साध्या विचारांची* खिचडी-कढी खाऊ


या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते *स्वातंत्र्य आणि स्वैराचार* यातला फरकं ओळखुन स्वत:ला *"रीझनेबल"* बनवणं,

दुसर्‍यांच्या मतांना *आदर देणं*, 

दुसर्‍यांना वेळ देणं, *संवाद चालु ठेवणं*, 

मनाचं वातावरण नेहमी *हलकं फुलकं* ठेवणं, 

एकमेकांच्या अस्तित्वाची *जाणिव ठेवणं* 

आणि बरंचकाही.


या सगळ्यातला *समतोल* हरवला ना 

की आपल्या नात्यांना *अपंगत्व* येणारंच 

आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही 

म्हणुन मनाला कायमची *बेडरेस्ट* पण मिळु शकते.


माणुस आहे, 

मनं पण *थकतं* हो कधीकधी, 

त्याला *इंस्टंट एनर्जी* मिळते ती फक्त एक कप *काॅन्फिडन्सच्या चहाने*, 

*वाह ताज !!!*


सगळ्यात महत्वाचं 

कि आपल्या डाएट चे *साईड इफेक्ट्स* खुप मस्त असतातं.


लोकं *प्रेमात पण पडु शकतात* तुमच्या. 

तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो, 

तुम्ही *यंग* वाटू लागता, *टेंन्शन कमी होतात*, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच *हलकं* होतं. 

वास्तविक, *मन* *ओके* असेल 

तरचं *लाईफ ओके* असतं, नाही कां?


असं ह्या डाएट चं *व्रत* 

हे आजच्या *सॅन्डव्हिच जीवनशैली* मधे एक *संजीवनी* देईल हे नक्की.


साध्या आणि ताज्या विचारांच *सॅलड* आपली नक्की काळजी घेईल. 


*शाकाहारी विचार* लंबी ऊम्र देऊन जातील. 

बदल हा नेहमीच चांगला असतो.


असा *मानसिक डाएट* एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना ?


(कॉपी पेस्ट)

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी