Posts

तरुणाई भरकटते आहे…

तरुणाई भरकटते आहे…एक चिंताजनक वास्तव        आजची तरुणाई ही देशाची ऊर्जा, क्षमता आणि उद्याचे नेतृत्व आहे. प्रत्येक पिढीत तरुणांकडून समाजाला बदलण्याची, नवी दिशा देण्याची अपेक्षा असते. परंतु आजच्या गतिमान, डिजिटल आणि स्पर्धात्मक युगात तरुण पिढी अनेक दिशांनी भ्रमित होताना दिसते. “तरुणाई भरकटते आहे” हे वाक्य केवळ तक्रार किंवा आरोप नाही, तर एक सामाजिक वेदना आणि पालक-शिक्षकांची चिंता आहे. या भरकटण्यामागील कारणे समजून घेणे आणि योग्य उपाययोजना करणे हे काळाचे गरज बनले आहे. १. भरकटण्याची कारणे (अ) सोशल मीडियाचे व्यसन मोबाईल आणि सोशल मीडिया हे तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. माहितीपेक्षा अधिक प्रमाणात गैरमाहिती, नकारात्मकता, तुलना आणि आभासी जगातील आकर्षणे तरुणांना वास्तविकतेपासून दूर नेत आहेत. Likes, followers, reels यांची धुंदी इतकी वाढली आहे की अनेकजण स्वतःची ओळखच डिजिटल प्रतिमेशी जोडू लागले आहेत. (आ) चुकीचे आदर्श आणि ग्लॅमरचे आकर्षण फिल्मी हिरो, इन्फ्लुएन्सर्स, रिअॅलिटी शो कलाकार—हेच नवे “आदर्श” झाले आहेत. कठोर परिश्रम, शिस्त, संघर्ष यांचे महत्त्व कमी हो...

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

          आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-19 नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतले पाहिजे की, गेली काही वर्षे जशी एखादी संसर्गजन्य आजाराची साथ पसरावी, त्याप्रमाणे आत्महत्यांची एक सुप्तसाथ आज आपल्या देशात पसरली आहे.       भारतात दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आत्महत्या केल्याने होतो. त्यामधील निम्म्या म्हणजे साधारण एक लाख आत्महत्या या 15 ते 35 या वयोगटातील म्हणजे तरुणाईच्या असतात. आपण थोडे हळहळतो आणि काही दिवसांनी हे विसरून जातो. पण हा विषय खूप गंभिर आहे.       'युवाल नोवा हरारी' हा आजच्या जगातील एक महत्वाचा भाष्यकार असे म्हणतो की, ‘’युद्ध आणि दहशतवाद ह्यापेक्षा 'आत्महत्या’ हा आजच्या जगासाठी खूप अधिक महत्वाचा प्...

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

खरंतर परीक्षेची भीती कमी-जास्त प्रमाणात आपल्यातल्या प्रत्येकालाच वाटते. काहीजण या भीतीपोटी जास्त अभ्यास करतात, तर काही जणांची ही भीती इतकी अवास्तव बनते की, परीक्षेच्या आधीपासूनच त्यांना धडधडायला लागते.  पोट बिघडते, झोप उडते, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना हातात प्रश्नपत्रिका आली, की एकदम बधिर व्हायला होते. एकही प्रश्न ओळखीचा वाटत नाही, बघता बघता प्रश्नपत्रिकेवरची अक्षरे ‘गायब’ होऊ लागतात! मुले एकदम ‘ब्लँक’ होतात. यालाच एक्झाम फोबिया (exam phobia) किंवा ‘परीक्षेची अवास्तव भीती’ म्हणतात. परीक्षेच्या भीतीची मेंदूतील केंद्रे :  मेंदूतील चार मुख्य केंद्रांमधून हे कार्य घडते. हायपोथॅलॅमस  : मेंदूच्या मध्यभागातील हे केंद्र भावना समजून त्यांच्या योग्य त्या संवेदना मेंदूला आणि त्याचवेळेस अंतःस्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथींना पोचवते! ॲमिग्डेला  : हेही मेंदूच्या मध्यभागातील केंद्र भावनिक मेंदू व तार्किक मेंदूच्या मधल्या सेतूचे काम करते. पण हे केंद्र जास्त उत्तेजित झाले, तर तार्किक विचारशक्ती बंद पडते. हिप्पोकॅम्पस  : पहिल्या दोन्ही केंद्रांच्या अगदी जव...

दुर्देव

  हिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात M.Tech चे उच्च शिक्षण घेत होता, अजून चार महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरु केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखा, समाधानात सुरु होते.  आणि मग अचानक २२ सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोर वरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की “तुमच्या मुलाचा अक्सिडेंट झालाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा” अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्देवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल ? बापाला बेंगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमधे दाखल केले. वडिल प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोनयेतो की “डॉक्टर म्हणालेत, मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त एक टक्का चान्स असेल जगण्याचा” काय निर्णय घेतला असेल बापाने. दुस...

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम

Image
 

तलाठी भरती - अर्ज भरणेची प्रक्रिया सुरू

 सविस्तर माहितीसाठी येथे Click करा. 👉  Open महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती  २०२३ . ⇒  पदाचे  नाव :   तलाठी . ⇒ एकूण  रिक्त  पदे :   4644  पदे . ⇒  नोकरी  ठिकाण :  महाराष्ट्र. ⇒  शैक्षणिक  पात्रता :  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ⇒  वयोमर्यादा :   खुला प्रवर्ग:  18 ते 38 वर्षे,  मागास प्रवर्ग:  18 ते 43 वर्षे. ⇒ वेतन/ मानधन : रु, 25,500/- ते रु. 81,100/-. ⇒ अर्ज करण्याची पद्धत :  ऑनलाइन. ⇒  अर्ज  शुल्क :  खुला प्रवर्ग :  ₹1000/- ,   राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) :  ₹900/- . ⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख:   26 जून २०२३ . ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख:   17 जुलै २०२३.

नाहीतर पंचविशीत हार्ट अँटॅक हा ट्रेंड होईल!!

 हजारो ह्रदयविकारी रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे जीव वाचविणार्या ४१ वर्षांच्या डाॅ. गौरव गांधी यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील जामनगरात हे घडले.  माझ्याकडे २० ते ३० वर्ष वयाचे तरूण ब्लड प्रेशर घेऊन मोठ्या संख्येने येत आहेत. या वयात रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू करायला लागाव्यात असे का घडत आहे? डाॅ. गौरव गांधी यांना व्यसन नव्हते. रात्री छातीत दुखू लागल्यावर त्यांनी, ईसीजी करून घेतला जो नाॅर्मल आला. पित्त समजून घरी परतल्यावर काही तासानंतर ते बेशुद्ध झाले, व्हेंटिलेटरवर ठेवले. पण उपयोग झाला नाही. पोस्ट माॅर्टेम मध्ये ह्रदयात कोणतेही बदल दिसले नाहीत. कारण लक्षणे उद्भवणे आणि मृत्यू यामधील वेळ अत्यंत कमी असेल तर ह्रदयात खुणा सापडत नाहीत. ७ तासाच्या कालावधीत त्या मिळतात.  ह्रदयविकार झटक्यांच्या ३०% केसेसमध्ये ईसीजी नाॅर्मल येतो. अशावेळी हाॅस्पिटलात पुढे २४ तास रहाणे अनिवार्य ठरते. ईसीजी ठराविक अंतराने करणे आणि रक्तातील ट्रोपोनीन व क्रियाटीनीन व अन्य चाचण्या  तपासाव्या लागतात.  तरूण वयात ह्रदयविकार वाढले आहेत कारण स्ट्रेस वाढलाय. मान...

भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी भरती

Image
  भारतीय डाक विभागामार्फत महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये  GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक  इ. पदांच्या  2508+  जागांसाठी  महाराष्ट्र टपाल विभाग मेगा भरती 2023  जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार शैक्षणिकदृष्ट्या  10वी उत्तीर्ण  असावा व मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी  शेवट तारीख 16 फेब्रुवारी 2023  च्या आत महाराष्ट्र टपाल विभागाची  अधिकृत वेबसाईट  maharashtrapost.gov.in   ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी. विभागाचे नाव : भारतीय टपाल विभाग जाहिरात क्र : 17-21/2023-GDS एकूण जागा : 2508+ जागा पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक- GDS 1) ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 3) डाक सेवक शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र वयाची अट : 18 ते 40 वर्षांपर्यंत जाहिरात पहा 👉 Click Here  Source:...

संविधान दिन विशेष- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील भाषण

 भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्याच्या एक दिवस आधीचे संविधान सभेतील शेवटचे भाषण. …माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. …केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्यामते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच ...

वाणिज्य शाखेतील करिअर भाग 2 - कॉस्ट अँड वर्क अकौंटंट

Image
कॉस्ट अँड वर्क अकौंटंट (ICWA) वाणिज्य क्षेत्रात कॉस्ट अकौंटंट ही एक महत्त्वाची शाखा आहे. उत्पादन केलेल्या वस्तूंची किंमत ठरवणं हे खूपच कौशल्याचं आणि हुशारीचं काम आहे. कारण बाजाराचा ट्रेन्ड काय आहे ? त्या उत्पादनाच्या इतर प्रतिस्पर्थ्यांनी त्यांच्या उत्पादनाची किती किंमत ठेवली आहे ? त्यांच्यापेक्षा किंमत कमी ठेवूनही फायदा होईल का ? त्या किंमतीतून खर्च वजा जाता उत्पादकाला नफा होणार आहे नं ? या सगळ्याचा कॉस्ट अकौंटंटचा अभ्यास असावा लागतो. त्यासाठी बाजाराची आणि उत्पादनाची संपूर्ण माहिती त्याला असावी लागते. तरच तो किंमत ठरविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा विचार करू शकतो आणि त्यावर नियंत्रणही ठेवू शकतो. हेच त्याचं मुख्य काम आहे.  अर्थात केवळ उत्पादनाची किंमत ठरवणंच नाही तर त्या उत्पादनाबरोबर दिल्या जाणाऱ्या सेवेचं मूल्यही त्यालाच ठरवायचं असतं. मग त्यासाठी उत्पादनाला लागणारा कच्चा माल, त्यावरचा खर्च, लागणारी यंत्रसामुग्री, यंत्रांची दुरुस्ती, त्याचा खर्च, कामगारांचं वेतन, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा खर्च, कारखान्याच्या जागेचा खर्च, वीज-पाण्याचा खर्च, मार्केटिंगचा खर्च, विक्री व्यवस्थेच...

वाणिज्य शाखेतील करिअर : चार्टर्ड अकौंटंट

Image
वाणिज्य क्षेत्र निवडल्यानंतर अनेकांचा कल 'सी. ए.' करण्याचाच असतो. व्यापारी संस्था, वित्त संस्था, सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांचे आर्थिक व्यवहार ठीकठाक आहेत किंवा नाही हे चार्टर्ड अकौंटंट पाहतो. त्याचप्रमाणे अकौंटंट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखभाल ठेवण्याचे कामही त्याला पार पाडावे लागते. वर्षभरातील व्यवहारांच्या पावत्या आणि बिले यांचं निरीक्षणाचे कामही करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. योग्य त्या लेखा वह्यांमध्ये पैशाच्या व्यवहाराची नोंद केली जाते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याप्रमाणेच संस्था आपले कर, परवाने याबाबतीत भरावे लागणारे पैसे योग्य वेळी भरले जातात अथवा नाही, याची काळजी घेतो. वार्षिक आर्थिक परिपत्रक तयार करून त्यात जमा, खर्च याविषयी नोंदी करतो. चार्टर्ड अकौंटंटकडून संस्थेच्या लेखा परीक्षणास कायद्याने संमती दिली आहे. त्याने एकदा हे परीक्षण केले की, त्या संस्थेचा वार्षिक आर्थिक व्यवहार मान्य केला जातो. 'सी. ए.' हा व्यवसाय म्हणूनच खूप प्रतिष्ठेचा समजला जातो. त्याचप्रमाणे स्वतंत्र व्यवसायही करता येतो. शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकौंटंट होण्यासाठी फाउ...