वाणिज्य शाखेतील करिअर भाग 2 - कॉस्ट अँड वर्क अकौंटंट

कॉस्ट अँड वर्क अकौंटंट (ICWA)


वाणिज्य क्षेत्रात कॉस्ट अकौंटंट ही एक महत्त्वाची शाखा आहे. उत्पादन केलेल्या वस्तूंची किंमत ठरवणं हे खूपच कौशल्याचं आणि हुशारीचं काम आहे. कारण बाजाराचा ट्रेन्ड काय आहे ? त्या उत्पादनाच्या इतर प्रतिस्पर्थ्यांनी त्यांच्या उत्पादनाची किती किंमत ठेवली आहे ? त्यांच्यापेक्षा किंमत कमी ठेवूनही फायदा होईल का ? त्या किंमतीतून खर्च वजा जाता उत्पादकाला नफा होणार आहे नं ? या सगळ्याचा कॉस्ट अकौंटंटचा अभ्यास असावा लागतो. त्यासाठी बाजाराची आणि उत्पादनाची संपूर्ण माहिती त्याला असावी लागते. तरच तो किंमत ठरविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा विचार करू शकतो आणि त्यावर नियंत्रणही ठेवू शकतो. हेच त्याचं मुख्य काम आहे. 

अर्थात केवळ उत्पादनाची किंमत ठरवणंच नाही तर त्या उत्पादनाबरोबर दिल्या जाणाऱ्या सेवेचं मूल्यही त्यालाच ठरवायचं असतं. मग त्यासाठी उत्पादनाला लागणारा कच्चा माल, त्यावरचा खर्च, लागणारी यंत्रसामुग्री, यंत्रांची दुरुस्ती, त्याचा खर्च, कामगारांचं वेतन, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा खर्च, कारखान्याच्या जागेचा खर्च, वीज-पाण्याचा खर्च, मार्केटिंगचा खर्च, विक्री व्यवस्थेचा खर्च, कर्जाऊ रकमेवरचं व्याज, नंतर दिल्या जाणाऱ्या सेवेचा खर्च, ट्रान्सपोर्टचा खर्च इतर खर्च इत्यादी सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन, अभ्यास करून मग वस्तूंच्या किंमती कॉस्ट अकौंटंट ठरवतो. एकूण जमाखर्चाचा मेळ घालून आहे त्या व्यवस्थेत किती प्रमाणात उत्पादन घेता येईल याचा आराखडा कॉस्ट अकौंटंट करत असतो. अनावश्यक खर्च, कामचुकारपणा, विनाकारण मालाचा वापर या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणं, त्यावर उपाययोजना करणे ही जबाबदारीही असते. आर्थिक व्यवहारातील दोष दूर करणं तसंच वार्षिक आढाव्यावरून भविष्यातील किंमतींचा अंदाज हे कॉस्ट अकौंटंटच मालकाला देतो. या क्षेत्रात कामाला करिअरला संधी खूपच आहे. मात्र त्यासाठी विषयाच्या अभ्यासाबरोबरच वाणिज्य शाखेचं ज्ञान आणि मृदू पण ठाम बोलणं, प्रभावी आकर्षक व्यक्तिमत्वं जर असेल तर या क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरतं.

कॉस्ट किंवा वर्क्स अकौंटंट परीक्षेसाठी पात्रता -

विद्यार्थी १२वी उत्तीर्ण पाहिजे. १२वी नंतर प्रवेश परीक्षा देऊन मध्यमा परीक्षेसाठी पात्र होता येतं. किंवा वाणिज्य शाखेचा पदवी मिळवल्यानंतर (किमान ५० टक्के गुण) थेट मधल्या परीक्षेलाही बसता येतं. प्रवेश परीक्षेसाठी गणित, इंग्रजी व सामान्य ज्ञान असे तीन पेपर असतात. मध्यमा आणि अंतिम परीक्षेचा कालावधी १२ महिन्यांचा असतो. परीक्षेचे शिक्षण पोस्टाने पत्राद्वारा अथवा प्रत्यक्ष वर्गांमध्ये दिले जाते. पण ते सक्तीचं आहे. मुंबईत पत्रामार्फत शिक्षण डिरेक्टोरेट ऑफ कोचिंग - अॅडमिनिस्ट्रेशन, वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकौंटंटस् ऑफ इंडिया, रोहित चेंबर्स, घोघा स्ट्रीट, ४था मजला, मुंबई १ या ठिकाणी दिलं जातं.


प्रशिक्षण देणाऱ्या संस्था

  1. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकौंटंट्स ऑफ इंडिया, १२, सदर स्ट्रीट, कलकत्ता ७०००१६.
  2. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकौंटंट्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूशनल एरिया ३, लोदी रोड, नवी दिल्ली ११०००३. 
  3. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकौंटंट्स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिल, रोहित चेंबर्स, घोघा स्ट्रीट, चौथा मजला, मुंबई ४०० ००१.
  4. सदर्न इंडिया रीजनल कौन्सिल ऑफ आयसीडब्ल्यूएआई, ६५, एमोर, मद्रास ६००००८.
  5. पूना इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटंट्स, शाहू कॉलेज रोड, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, फेज २, लक्ष्मीनगर, पुणे ४११००९. 
  6. ईस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिल ऑफ आयसीडब्ल्यूएआई, ८४, हरीश मुखर्जी मार्ग, कलकत्ता ७०० ०२५.
  7. चॅप्टर ऑफ कॉस्ट अकौंटंट्स, १७३०, राजारामपुरी, ६वी गल्ली, कॉम्प्युटर क्लबजवळ, कोल्हापूर ४१६ ००८.
  8. चॅप्टर ऑफ कॉस्ट अकौंटंट्स, तर्फे एलएसडी कॉलेज, अंबाझरी मार्ग, गांधीनगर, नागपूर - ४४० ०१०.
  9. चॅप्टर ऑफ कॉस्ट अकौंटंट, १, जयश्री, विश्वदीप, गंगापूर रोड, नाशिक - ४२२००२.


(संदर्भ: भीमराव गलांडे फौंडेशन, करिअर वाटा) 

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी