वाणिज्य शाखेतील करिअर : चार्टर्ड अकौंटंट


वाणिज्य क्षेत्र निवडल्यानंतर अनेकांचा कल 'सी. ए.' करण्याचाच असतो. व्यापारी संस्था, वित्त संस्था, सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांचे आर्थिक व्यवहार ठीकठाक आहेत किंवा नाही हे चार्टर्ड अकौंटंट पाहतो. त्याचप्रमाणे अकौंटंट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखभाल ठेवण्याचे कामही त्याला पार पाडावे लागते. वर्षभरातील व्यवहारांच्या पावत्या आणि बिले यांचं निरीक्षणाचे कामही करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. योग्य त्या लेखा वह्यांमध्ये पैशाच्या व्यवहाराची नोंद केली जाते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याप्रमाणेच संस्था आपले कर, परवाने याबाबतीत भरावे लागणारे पैसे योग्य वेळी भरले जातात अथवा नाही, याची काळजी घेतो. वार्षिक आर्थिक परिपत्रक तयार करून त्यात जमा, खर्च याविषयी नोंदी करतो. चार्टर्ड अकौंटंटकडून संस्थेच्या लेखा परीक्षणास कायद्याने संमती दिली आहे. त्याने एकदा हे परीक्षण केले की, त्या संस्थेचा वार्षिक आर्थिक व्यवहार मान्य केला जातो. 'सी. ए.' हा व्यवसाय म्हणूनच खूप प्रतिष्ठेचा समजला जातो. त्याचप्रमाणे स्वतंत्र व्यवसायही करता येतो.

शैक्षणिक पात्रता :

चार्टर्ड अकौंटंट होण्यासाठी फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल अशा तीन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. मे आणि ऑक्टोबर - नोव्हेंबर अशा वर्षातून दोनदा या परीक्षा घेतल्या जातात. फाउंडेशननंतर एखाद्या सी. ए. च्या हाताखाली काम करून अनुभव मिळवणंही गरजेचं असतं. त्याचप्रमाणे या परीक्षेचा निकाल अवघा दोन ते तीन टक्के इतकाच लागत असल्याने अतिशय हुशार असूनही पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाल्याची उदाहरणं अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहेत. त्यामुळे प्रयत्नातील सातत्य आवश्यक. त्यामुळे एकदा का 'सी.ए.' ची पायरी ओलांडली की, पुढचा मार्ग सुकर असतो.

सी. ए. च्या परीक्षेसाठी नोंदणी खालील संस्थेत होते.

जॉईंट डायरेक्टर ऑफ स्टडीज, वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स, २७, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४००००५.

संस्था व तिच्या शाखांचे पत्ते

१. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया, मथुरा रोड, पीबी २६८, नवी दिल्ली ११०००२.

२. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया, वेस्टर्न रीजन, २७, कफ परेड, कुलाबा, मुंबई ४०० ००५. 

३. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा, २८ अ, बुधवार पेठ, अप्पा बळवंत चौकाजवळ, पुणे. 

४.सदर्न रीजनल सेक्रेटरिएट १२२, नुगंम्बकम् हाय रोड, पीबी-३३१४,मद्रास ६०००३४.

५. ईस्टर्न रीजनल सक्रेटरिएट ७, रसेल स्ट्रीट, कलकत्ता ७०००७१. 

६. सेंट्रल रीजनल सेक्रेटरिएट १६/१७ सिव्हिल लाईन्स, कानपूर २०८००१.

७. नॉदर्न सेंट्रल रीजनल सेक्रेटरिएट, दुसरा मजला, अनेक्स, आयपी मार्ग,नवी दिल्ली ११०००२.

परीक्षेचे स्वरूप

सीपीटी परीक्षा जून व डिसेंबर या महिन्यात घेतली जाते. फंडामेंटल अकौंटिंग, लॉ; तसेच समाजशास्त्र आणि कल चाचणी आदी विषय असतात. २०० मार्कांची ही परीक्षा असून, त्यासाठी ४ तास असतात आणि प्रत्येक विषयात किमान ३० टक्के गुण मिळवायचे असतात. निगेटिव्ह मार्किंग असते. इंटर्नशिपच्या शेवटच्या वर्षात इंडस्ट्रियल इंटर्नशिप करावी लागते. इंटर्नशिप करित असताना विद्यार्थ्यांना मानधन मिळते. सीए स्वतःची प्रॅक्टिस करू शकतात. महिलांसाठीही हे क्षेत्र चांगलं आहे.

दहावीनंतर विद्यार्थ्यांना सीएची तयारी करता येऊ शकते. सीए होण्यासाठी तीन स्तरांतून जावे लागते. प्रथम सीपीटी ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यात पास झाल्यास ‘आयपीसीसी’ ही परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर तीन वर्षे इंटर्नशिप करावी लागते आणि फायनलनंतर सीए होता येते. वाणिज्य शाखेत असणारे मोठ्या प्रमाणात या क्षेत्राकडे येत असले, तरी सायन्समध्ये शिक्षण घेतलेले देखील सीए होऊ शकतात. आता पदवी आणि CA एकत्रही करता येते.

CA फक्त Tax Return भरतो असा गैरसमज आहे; परंतु सध्याच्या वाढत्या औद्योगिकीकरणात सीए विविध प्रकारची कामं करू शकतात. व्यावसायिक भाषेत सीएला फायनान्शियल डॉक्टर म्हटलं जातं; तसेच व्यवसायाच्या दृष्टीने देखील सीए महत्त्वाचा असतो. व्यवसायातील नफा-तोटा आणि व्यवसायावर अप्रत्यक्षपणे नजर ठेवण्याचे जोखमीचे काम त्याला करावे लागते. पूर्णवेळ, अर्धवेळ अशा दोनही स्वरूपांत काम करता येते. इन्कम टॅक्स, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स आणि एलबीटी आदी करांसंबंधीची महत्त्वाची कामे सीए करतो.

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात परकीय कंपन्या गुंतवणूक करित आहेत. त्यामुळे या कंपन्यांनादेखील सीएची गरज भासणार आहे. नव्याने येणारे बीपीओ, केपीओ यांच्यासाठी सल्लागार म्हणून सीए आवश्यक असतात. यासह नवीन खाजगी बँका आणि फायनान्स कंपन्यादेखील चांगल्या, हुशार सीएंच्या शोधत असतात. व्यवसायात खरेदी-विक्री आली, की त्याठिकाणी सीएची गरज पडते. त्यामुळे भारतात कितीही सीए निर्माण झाले, तरी मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे.


संदर्भ: भीमराव गलांडे फौंडेशन व मटा

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी