Posts

मॅनेज युअर अँगर (राग व्यवस्थापन)

Image
राग ही खूप प्रखर; पण सामान्य भावना आहे. रागाची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलत असते. रागाची तीव्रता खूप वाढली, तर रागाचे रूपांतर संताप आणि हिंसेमध्ये होऊ शकते. ही गोष्ट राग येणाऱ्या आणि राग आलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे रागाचे योग्य वेळी, योग्य रितीने व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट आहे. आजच्या गतिमान जीवनशैलीत ताण, वैफल्य, भिती, असुरक्षिततेची जाणीव, दहशत, अपेक्षाभंग इत्यादी गोष्टींचे प्रमाण वाढलेले आहे. याचा परिणाम 'राग' या सर्वात जास्त नकारात्मक असलेल्या भावनेच्या प्रदर्शनातून व्यक्त होत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर 'राग' ही भावना जन्माला येते. विविध वयांतील अनेक माणसे रागावर नियंत्रण कसे करावे, याची विचारणा करत असतात. यावरूनच ही भावना खूप प्रखर असल्याचे लक्षात येते. म्हणूनच योग्य वेळी, योग्य रितीने रागाचे व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट म्हणून आत्मसात करण्यास काहीच हरकत नाही. त्याची सुरुवात आपण प्रथम रागाची कारणे शोधून करूया. ही कारणे पुढील प्रमाणे विभागू शकतो. * रागास जबाबदार व्यक्तींमधील अंतर्गत घ...

मेड फॉर इच अदर

 कागदावर जुळलेली पत्रिका आणि  काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं. निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा? त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच..त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं. अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे. कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा.. या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर म...

स्वतःला वचन द्या

मित्र/मैत्रिणींनो आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आनंदी आणि समाधानी राहणं आपल्याच हाती असत, परंतु आपण मात्र परिस्थितीला दोष देत बसतो. चला तर जाणून घेऊयात स्वतः अंगिकारता येतील असे काही मूलमंत्र.... ════════════════════ 🌿 एवढं मजबूत मन बनवायचं आहे की कोणतीही घटना, परिस्थिती तुमच्या मानसिक शांतीला ढळू देणार नाही. 🌿 मी ज्या ज्या व्यक्तींना भेटणार त्यांच्याशी आरोग्य, आनंद, समृद्धी बद्दल नक्की बोलणार. 🌿 माझ्या मित्र/मैत्रिणींशी अशाप्रकारे बोलणार की त्यांना जाणवून देईल की त्यांच्यात ही काहीतरी चांगलं आहे. 🌿 आपल्या आयुष्यातील आधीपासून चांगल्या असणाऱ्या गोष्टींबद्दल रोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करणार. उदा. माझ्यावर प्रेम करणारे आई वडील, मित्रमंडळी आहेत, माझं आरोग्य चांगले आहे, मी माझे ध्येय प्राप्त करण्याकरिता योग्य प्रयत्न करत आहे त्याबद्दलमी आभारी आहे. हे लिहत चला वही मध्ये रोज किंवा मनात म्हणू शकतात तुम्ही ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहात त्याबद्दल. 🌿 विचार करायचा झाला तर तो चांगलाच करणार, आणि चांगल्यासाठीच करणार, त्यातून चांगलं काहीतरी घडणार आहे म्हणून करणार. 🌿 इतरांच्या यशाब...

तणाव व्यवस्थापन

बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.  मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !' वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला.  मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला.  सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली...

प्रेमविवाह: प्रेम आणि विवाह, प्रेम की विवाह

  अक्षय वय वर्ष 30 उच्चशिक्षित, बिझिनेस एकहाती उत्तमरित्या सांभाळणारा, घरात एकुलता एक असल्याने लहानपणापासून च सगळ्यांचा लाडका, हरहुन्नरी, हुशार, मनमोकळ्या स्वभावाचा... नुकतंच चार वर्षांपूर्वी लग्न झालं. बायको अस्मिताही दिसायला गोरी गोमटी, नाजूक, प्रथितयश कंपनीत उच्चपदावर काम करणारी.... घरच्यांना आवडलेली... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षयवर जीव ओळवून टाकणारी... इतकं सगळं छान सुरळीत सुरू असताना अक्षय ला माझी आठवण का यावी हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.....तर झालं असं की अक्षय एकदा असाच खूप व्यथित होऊन त्याच्या एका मैत्रिणीशी बोलायला गेला आणि तिने त्याला माझ्याकडे पाठवलं... अक्षय आणि अस्मिताचं love marriage होतं... पण सध्या दोघांमध्ये सारख्या कुरबुरी सुरू होत्या. छोट्या छोट्या कारणांवरून त्या दोघांमध्ये मोठमोठी भांडणं व्हायला लागली होती आणि आपसूकच याचा परिणाम त्यांच्या घरावर व्हायला लागला होता. एक अशांतता पसरली होती. आणि या प्रॉब्लेम वर दोघांनाही तोडगा काढता येत नव्हता.. साधारण 12 वर्षांचं नातं आणि 3 वर्ष लग्नाची अशी एकूण १५ वर्ष ते एकमेकांना ओळखत होते... पण तरीही कुठेतरी काह...

वन बेडरुम फ्लॅट

माझ्या वडिलांचे स्वप्न हाेते की, मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करुन अमेरीकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत नाेकरीला लागावे. जेव्हा मी अमेरीकेत आलाे तेव्हा हे स्वप्न जवऴपास पुर्ण हाेत आले हाेते. आता शेवटी मला जिथे हवे तिथे मी पाेहचलाे हाेताे. मी असे ठरवले हाेते.. की पाच वर्ष मी इथे राहुन बक्कळ पैसा कमवेल, की जेणे करुन भारतात गेलाे की, पुण्यासारख्या शहरात सेटल हाेईल. माझे वडील सरकारी नाेकरीत हाेते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट, अन तुटपुंजी पेंशन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे हाेते. घरची...आई-बाबांची खुप आठवण यायची. एकट वाटु लागायच. स्वस्तातलं एक फाेन कार्ड वापरुन मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना काॕल करत हाेताे. दिवस वार्‍यासारखे उडत हाेते. दाेन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेली. अजुन दाेन वर्ष परकिय चलनाचे दर पाहण्यात गेले. रुपयाची घसरण झाली की, मला जाम आनंद व्हायचा.      लग्नासाठी राेज नवनवीन स्थळ येत हाेती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय  घेतला. आईवडीलांना सांगितले मला फक्त दहा दिवसांची सुट्टी भेटेल त्या दहा दिवसातच सर्व काही झालं पाहिजे. स्वस्तातले तिक...

अचानक हृदयविकार उदभवल्यास काय करावे ?

सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! अचानक हृदयविकार उदभवला तर काय करावे ? लक्षणे ओळखा शिड्या चढल्यामुळे किंवा पळल्यामुळे दम लागत असेल, छातीत डाव्या किंवा उजव्या बाजूला दुखत असेल तर ही हृदयरोगाच्या प्रारंभाची लक्षणे असू शकतात. आखडल्यासारखे किंवा घशामध्ये कोंडल्यासारखे वाटणेही हृदयरोगाशी संबंधित आहे. हे तातडीचे उपचार करा तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला तर तत्काळ अँस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळवून प्यायला हवी. अटॅक आल्यानंतर सचेत होण्याचा कालावधी 60 मिनिटे असतो. दहा ते पंधरा मिनिटे एंजायना किंवा पित्त झाल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन कार्डियाक ग्राम करा. देखभाल वयाची 30 वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्या. त्यात उच्च् रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेहाची तपासणी होते. त्यानंतर वर्षातून एकदा तपासणी आवश्य करा. कुटुंबात कोणाला हृदयरोग असेल तर धोक्याची शक्यता दुपटीने वाढते. धोक्यात तर नाही ना? खाण्याबाबत बेफिकीर व फास्टफूड, तळलेले व मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धोक्याच्या पातळीच्या नजीक आहात. व्यायाम करत नसाल, वाढत्या वजनाबाबतही निष्काळजी असाल त...