अचानक हृदयविकार उदभवल्यास काय करावे ?
सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
अचानक हृदयविकार उदभवला तर काय करावे ?
लक्षणे ओळखा
शिड्या चढल्यामुळे किंवा पळल्यामुळे दम लागत असेल, छातीत डाव्या किंवा उजव्या बाजूला दुखत असेल तर ही हृदयरोगाच्या प्रारंभाची लक्षणे असू शकतात.
आखडल्यासारखे किंवा घशामध्ये कोंडल्यासारखे वाटणेही हृदयरोगाशी संबंधित आहे.
हे तातडीचे उपचार करा
तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला तर तत्काळ अँस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळवून प्यायला हवी.
अटॅक आल्यानंतर सचेत होण्याचा कालावधी 60 मिनिटे असतो. दहा ते पंधरा मिनिटे एंजायना किंवा पित्त झाल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन कार्डियाक ग्राम करा.
देखभाल
वयाची 30 वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्या. त्यात उच्च् रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेहाची तपासणी होते. त्यानंतर वर्षातून एकदा तपासणी आवश्य करा. कुटुंबात कोणाला हृदयरोग असेल तर धोक्याची शक्यता दुपटीने वाढते.
धोक्यात तर नाही ना?
खाण्याबाबत बेफिकीर व फास्टफूड, तळलेले व मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धोक्याच्या पातळीच्या नजीक आहात. व्यायाम करत नसाल, वाढत्या वजनाबाबतही निष्काळजी असाल तर हृदयरोग जडण्याची शक्यता आहे.
> तंबाखू आणि धूम्रपान, दारू पिणे
> गरजेपेक्षा जास्त खाणे आणि जंक फूड
> साखर, मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे जास्त सेवन
> कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे
> सर्वात आवडीचे पदार्थ कमी खा.
हे ताबडतोब बंद करा
हृदयासाठी हे आजपासूनच सुरू करा
30 मिनिटे व्यायाम. त्यामुळे वजन वाढणार नाही.
पाच प्रकारच्या हिरव्या भाज्या आणि फळे खा.
एकदा डॉक्टरांकडून वजन, रक्तदाब, रक्तवसा, रक्तशर्करा तपासून घ्या.
बागकाम, वाचन, योगाद्वारे तणावाचे व्यवस्थापन करा.
मधुमेह सायलेंट किलर आहेत. ते नियंत्रणात ठेवा.
हृदय आणि त्याच्या आजारांशी संबंधित भ्रम आणि वस्तुस्थिती
1. अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीनंतर व्यक्ती पूर्णत: सुदृढ होतो.
असे अजिबात नाही. कोरोनरी आर्टरीच्या (हृदयाजवळ पसरलेल्या रक्तवाहिन्या) आजारावर उपचारच नाही. त्यामुळे आयुष्यभर खबरदारी घेण्याबरोबरच औषधांची आवश्यकता आहे. हृदयरोगतज्ज्ञांच्या सूचनेनुसार वेळोवेळी तपासणी करणे बंधनकारक ठरते.
2. तुम्हाला तंदुरुस्त वाटत असेल तर तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा उच्च कोलेस्टेरॉल असूच शकत नाही.
हे सर्व सायलेंट किलर असतात. तपासणीअंतीच त्याचे निदान होते.
3. रक्तशर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि वजनात थोडीशी वाढ झाल्यास चिंतेचे कारण नाही.
चिंतेचे कारण आहेच. हे सर्व एकत्रित असतील तर हृदयरोगाचा धोका अडीच पटींनी वाढतो.
4. बालपणी वजन जास्त असेल तर युवावस्थेपर्यंत आपोआपच कमी होईल.
असे अजिबात नाही. बालपणीचे वजन युवावस्थेमध्येही स्थूलपणाचे कारण अवश्य ठरतेच.
5. मुलांना रक्तदाब किंवा मधुमेह होत नाही.
होऊ शकतो. कुटुंबात कोणाला जर हे आजार असतील तर बालपणीही हे आजार होऊ शकतात.
‘‘तुमची कंबर 36 इंचांहून एक इंचही वाढली तर सावधान व्हा. त्यामुळे हृदयरोगाचा धोकाही एक टक्क्याने वाढतो.’’
-डॉ. नरेश त्रेहान
( हृदयरोगतज्ज्ञ म्हणून 42 वर्षांचा अनुभव)
संदर्भ : दिव्य मराठी
Comments
Post a Comment