स्वतःला वचन द्या
मित्र/मैत्रिणींनो आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आनंदी आणि समाधानी राहणं आपल्याच हाती असत, परंतु आपण मात्र परिस्थितीला दोष देत बसतो. चला तर जाणून घेऊयात स्वतः अंगिकारता येतील असे काही मूलमंत्र....
════════════════════
🌿 एवढं मजबूत मन बनवायचं आहे की कोणतीही घटना, परिस्थिती तुमच्या मानसिक शांतीला ढळू देणार नाही.
🌿 मी ज्या ज्या व्यक्तींना भेटणार त्यांच्याशी आरोग्य, आनंद, समृद्धी बद्दल नक्की बोलणार.
🌿 माझ्या मित्र/मैत्रिणींशी अशाप्रकारे बोलणार की त्यांना जाणवून देईल की त्यांच्यात ही काहीतरी चांगलं आहे.
🌿 आपल्या आयुष्यातील आधीपासून चांगल्या असणाऱ्या गोष्टींबद्दल रोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करणार.
उदा. माझ्यावर प्रेम करणारे आई वडील, मित्रमंडळी आहेत, माझं आरोग्य चांगले आहे, मी माझे ध्येय प्राप्त करण्याकरिता योग्य प्रयत्न करत आहे त्याबद्दलमी आभारी आहे. हे लिहत चला वही मध्ये रोज किंवा मनात म्हणू शकतात तुम्ही ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहात त्याबद्दल.
🌿 विचार करायचा झाला तर तो चांगलाच करणार, आणि चांगल्यासाठीच करणार, त्यातून चांगलं काहीतरी घडणार आहे म्हणून करणार.
🌿 इतरांच्या यशाबद्दल मी तितकाच उत्साही असेल जितका मी माझ्या स्वतःच्या यशाबद्दल आहे.
🌿 भविष्यकाळातील चुकांमधून शिकवण घेणार आणि त्यांना विसरून एक नव्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणार.
🌿 आनंदी मुद्रा माझ्या चेहऱ्यावर नेहमी ठेवणार आणि ज्या ज्या लोकांना भेटणार त्यांना भेटताना स्मितहास्य देणार.
🌿 माझ्या सुधारणेसाठी मी एवढा वेळ देणार की इतरांवर टीका करण्यास मला वेळच मिळणार नाही.
🌿 मला असा विश्वास आहे की जर मी माझ्यातील उत्तम गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवत आहे तर सर्व जग हे माझ्या बाजूने आहे/असनार.
🌿 माझ्या रोजच्या जीवनात मी वरील सर्व गोष्टी करणार आहे. वरील अफरमेशन्स रोज सकाळी आणि रात्रीही म्हणणार आहे.
🌸मित्र/मैत्रिणींनो आयुष्य खूप सुंदर आहे, नेहमी सकारात्मक रहावे हा अट्टाहास नाही आहे, पण प्रत्येक घटनेकडे सकारात्मकतेने पाहायला हवं, समस्या प्रत्येकाला काही न काही आहेतच, प्रत्येकाशी चांगले वागावे, नकारात्मक लोकांपासून दूर रहा, चांगली पुस्तके वाचा, चांगले व्हिडिओ बघा youtube ला, आनंदी रहा🌸
हा संदेश तुमच्या मित्र/परिवारासोबत सामायिक करा...
═══════════════════
Very nice! I'm going to promise myself!
ReplyDeleteNice👍
ReplyDelete