Posts

Showing posts from September, 2021

अचानक हृदयविकार उदभवल्यास काय करावे ?

सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! अचानक हृदयविकार उदभवला तर काय करावे ? लक्षणे ओळखा शिड्या चढल्यामुळे किंवा पळल्यामुळे दम लागत असेल, छातीत डाव्या किंवा उजव्या बाजूला दुखत असेल तर ही हृदयरोगाच्या प्रारंभाची लक्षणे असू शकतात. आखडल्यासारखे किंवा घशामध्ये कोंडल्यासारखे वाटणेही हृदयरोगाशी संबंधित आहे. हे तातडीचे उपचार करा तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला तर तत्काळ अँस्प्रिनची गोळी पाण्यात विरघळवून प्यायला हवी. अटॅक आल्यानंतर सचेत होण्याचा कालावधी 60 मिनिटे असतो. दहा ते पंधरा मिनिटे एंजायना किंवा पित्त झाल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन कार्डियाक ग्राम करा. देखभाल वयाची 30 वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्या. त्यात उच्च् रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेहाची तपासणी होते. त्यानंतर वर्षातून एकदा तपासणी आवश्य करा. कुटुंबात कोणाला हृदयरोग असेल तर धोक्याची शक्यता दुपटीने वाढते. धोक्यात तर नाही ना? खाण्याबाबत बेफिकीर व फास्टफूड, तळलेले व मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धोक्याच्या पातळीच्या नजीक आहात. व्यायाम करत नसाल, वाढत्या वजनाबाबतही निष्काळजी असाल त...

राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त थोडेसे

        🌹प्रथमतः सर्वांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या शुभेच्छा🌹  दिनांक २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारच्या  शिक्षण मंत्रालयाने सन १९६९-७० मध्ये सुरू केलेली   एक   योजना.   सुरुवातीस   ही   योजना  सक्तीच्या  राष्ट्रीय  छात्रसेना योजनेचा पर्याय  म्हणून  सुरू  झाली. राष्ट्रीय छात्रसेना  दलात न  जाणाऱ्या  महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांने राष्ट्रीय सेवा  योजनेत  भाग  घ्यावा , अशी अपेक्षा होती. पुढे  या योजनेतील फार मोठी आर्थिक  जबाबदारी ध्यानात घेऊन प्रत्येक राज्यातील निवडक महाविद्यालयांपुरतीच  ही  योजना  लागू  करण्यात  आली. रा ष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रा...

मेंदूला ताप ताणाचा

       रोजच्या आयुष्यातही आपल्यातील प्रत्येकाला वेगवेगळे ताण असतात. त्यासाठी व्यक्तीची नोकरी वा व्यवसायच तणावपूर्ण असावा लागतो असं नाही. अनेकदा ताणांचा निचरा न होता तो नेहमीचा होतो आणि मग ताणाशी सामना करण्यासाठी शरीरात असलेली यंत्रणा गोंधळून जाते. याचे शरीराबरोबरच मेंदू आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होत असल्यामुळे ताणांना तोंड देण्यासाठी प्रत्येकानं स्वत:चा पर्याय शोधायलाच हवा.                सकाळी कामवाली बाई यायला उशीर होणं, ही घटना तशी अगदी छोटी. परंतु बहुसंख्य स्त्रियांना ती मनस्ताप देणारी ठरते. दूधवाला, पेपरवाला वेळेवर न येणं, घरातल्या मंडळींनी ठरावीक वेळेला न उठणं किंवा ठरवून दिलेली कामं वेळेवर न करणं, अशा विविध लहानमोठ्या गोष्टींमधून रोज जी मानसिक त्रासाची सुरुवात होते, ती यांसारख्या अनेक घटनांमधून दिवसभर वाढतच जाते.      ताणरहित जीवन कोणाचंच नसतं. फक्त ताणाची कारणं वेगळी आणि तीव्रता कमी अधिक असते इतकंच. यातील काही कारणांचा त्रास थोड्या कालावधीसाठी असतो, तर काही कारणं बराच काळ, असह्य पीडा देणारी असतात. तणावाबा...

पोलीस भरतीसाठी आवश्यक निकष

विद्यार्थिनीं मैत्रिणींनो ,  आपणास माहीतच आहे सध्या पोलीस भरती संदर्भातील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे ज्यांना पोलीस भरतीची  तयारी सुरु करावयाची असेल त्यांना भरती प्रक्रियेबाबत  सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. जर भरतीचे आवश्यक निकष माहित असतील तरच आपण योग्य दिशेने वाटचाल सुरु कराल. या लेखातून पोलीस भरतीसाठी आवश्यक अहर्ता व प्रक्रियेचा थोडक्यात आढावा घेतला आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पहा. वयाची अट खुल्या प्रवर्गासाठी : १८ ते २८ राखीव  प्रवर्गासाठी : १९ ते ३३ मराठा SEBC :  १८ ते ३३ SRPF वयोमर्यादा किती… खुल्या वर्गासाठी फक्त मुले : १८ ते २५ राखीव  प्रवर्ग : १८ ते ३० मराठा SEBC : १८ ते ३० ड्रायव्हर पदासाठी …  खुल्या वर्गासाठी : १९ ते २८ राखीव प्रवर्ग : १९ ते ३३ मराठा SEBC : १९ ते ३३ बॅन्ड्समन पदासाठी … फक्त मुले खुल्या वर्गात : १८ ते २८ राखीव प्रवर्ग : १८ ते ३३ मराठा SEBC : १८ ते ३३ शिक्षण  : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण) उंची  : मुलाची १६५ सेमी तर मुलीची १५५ सेमी,  SRPF : फक्त...

अर्जंट पाहिजेत

*🤲इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा🤲* एक शिंपी पाहिजे, जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल ! एक इलेक्ट्रिशियन पाहिजे, जो एकमेकांशी न बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये  पुन्हा एकदा कनेक्शन जोडून देईल ! एक ऑप्टिशियन पाहिजे, जो लोकांची दृष्टी आणि दृष्टीकोन नीट करून देईल ! एक कलाकार पाहिजे, जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्याचे रेषा रेखाटू शकेल ! एक बांधकामगार पाहिजे, जो दोन शेजाऱ्यांमध्ये उत्तम सेतू उभारू शकेल ! एक माळी काका पाहजे, जो चांगल्या विचारांच रोपण करू शकेल ! एक प्लंम्बर पाहिजे, जो तुंबलेल्या मनांना मोकळं करू शकेल ! एक शास्त्रज्ञ पाहिजे, जो एकमेकांबद्दलची ओढ शोधू शकेल ! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, एक शिक्षक पाहिजे, जो एकमेकांशी संवाद कसा साधायचा ते शिकवू शकेल ! आज तुम्हा-आम्हा, सर्वांना, याचीच नितांत गरज आहे..!!* (कॉपी पेस्ट)

शिक्षक म्हणजे समाजाचा खरा शिल्पकार

           सामना समाजाचे शिल्पकार म्हणजेच शिक्षक स्वत: साठी कधीच जगत नाहीत तर समाजाचे उज्ज्वल भवितव्य ऊर्जावान बनविण्यासाठी जगतात. चांगले शिक्षण कोणालाही बदलू शकते, परंतु एक चांगला शिक्षक सर्वकाही बदलू शकतो. असे शिक्षक कधीही कामावरून रिक्त किंवा सेवानिवृत्त होत नसतात. ते आयुष्यभर ज्ञानाची ज्योती पेटलेली ठेवतात. आजच्या स्वार्थी आणि व्यापारीकरणाच्या युगात 'शिक्षक दिनी' अशा प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ, शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या शिक्षकांना सन्मानित करायला हवे.         शिक्षकाला राष्ट्र निर्माणकर्ता म्हणतात. शिक्षकांची जबाबदारी ही आहे की, विद्याथ्यांना जगण्याच्या सर्व कलेत पारंगत होतील आणि समाजात सभ्य नागरिक म्हणून वावरतील. त्याद्वारे एक मजबूत समाज आणि राष्ट्र निर्माण करू शकतील. देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ राधाकृष्णन व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांचा असा विश्वास होता की, बलवान राष्ट्र घडविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका शिक्षक बजावतो. आपल्या देशात शिक्षण क्षेत्...

सूत्रसंचालन एक करिअर

मित्रहो,  सूत्रसंचालन हा विषय व्यापक आहे. ही कला आहे. तिला शास्त्रोक्त आधार आहे. हे लक्षात घेतलं तर सूत्रसंचालन हा व्यवसायही ठरू शकतो. ते करिअरही बनू शकते. यशस्वी सूत्रसंचालनकर्त्याला व्यवसायाची विविध दालन खुली झाली आहेत . हे दालनं, हे मार्ग कोणते ते आपण बघूया. यामध्ये मूळ सूत्रसंचालक - निवेदक हे जाहीर कार्यक्रमासाठीची भुमिका वठवणे हा व्यवसायच आहे . यात शंका नाही. हल्ली सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मोठ्या प्रमाणावर आहे. तेव्हा हेच करिअर केले तरी चालू शकते. पुरेसे मानधन यामधुन मिळवू शकता. छंद म्हणून सुत्रसंचालन करायचे असेल तर ठीक आहे ; पण हे उत्तम करिअर आहे हे ध्यानात ठेवा ! व्यावसायिक निवेदक म्हणून पैसा कमाविता येतो. ◆ वाद्यवृंद किंवा काव्य मैफल:      विविध काव्य मैफलींना निवेदकाची गरज नित्य भासते, अशावेळी कवी नसलेला निवेदक असला तर तो चौफेर निवेदन करू शकतो. गाजलेल्या काव्यपंक्ती पेरू शकतो, हा एक प्रकार किंवा मग ऑर्केस्ट्रा, गीत मैफलींचे संच - ग्रुप यामधून निवेदन करणे हा करिअरचा भाग ठरू शकतो. मोठ्या शहरामधून अर्धवेळ - पूर्णवेळ चालवले जाणारे वाद्यवृंद आहेत....