अर्जंट पाहिजेत
*🤲इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा🤲*
एक शिंपी पाहिजे,
जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल !
एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,
जो एकमेकांशी न बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये
पुन्हा एकदा कनेक्शन जोडून देईल !
एक ऑप्टिशियन पाहिजे,
जो लोकांची दृष्टी आणि दृष्टीकोन नीट करून देईल !
एक कलाकार पाहिजे,
जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्याचे रेषा रेखाटू शकेल !
एक बांधकामगार पाहिजे,
जो दोन शेजाऱ्यांमध्ये उत्तम सेतू उभारू शकेल !
एक माळी काका पाहजे,
जो चांगल्या विचारांच रोपण करू शकेल !
एक प्लंम्बर पाहिजे,
जो तुंबलेल्या मनांना मोकळं करू शकेल !
एक शास्त्रज्ञ पाहिजे,
जो एकमेकांबद्दलची ओढ शोधू शकेल !
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,
एक शिक्षक पाहिजे,
जो एकमेकांशी संवाद कसा साधायचा ते शिकवू शकेल !
आज तुम्हा-आम्हा, सर्वांना,
याचीच नितांत गरज आहे..!!*
(कॉपी पेस्ट)
Comments
Post a Comment