पोलीस भरतीसाठी आवश्यक निकष
विद्यार्थिनीं मैत्रिणींनो,
आपणास माहीतच आहे सध्या पोलीस भरती संदर्भातील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे ज्यांना पोलीस भरतीची तयारी सुरु करावयाची असेल त्यांना भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे. जर भरतीचे आवश्यक निकष माहित असतील तरच आपण योग्य दिशेने वाटचाल सुरु कराल. या लेखातून पोलीस भरतीसाठी आवश्यक अहर्ता व प्रक्रियेचा थोडक्यात आढावा घेतला आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पहा.
वयाची अट
खुल्या प्रवर्गासाठी : १८ ते २८
राखीव प्रवर्गासाठी : १९ ते ३३
मराठा SEBC : १८ ते ३३
SRPF वयोमर्यादा किती…
खुल्या वर्गासाठी फक्त मुले : १८ ते २५
राखीव प्रवर्ग : १८ ते ३०
मराठा SEBC : १८ ते ३०
ड्रायव्हर पदासाठी …
खुल्या वर्गासाठी : १९ ते २८
राखीव प्रवर्ग : १९ ते ३३
मराठा SEBC : १९ ते ३३
बॅन्ड्समन पदासाठी …
फक्त मुले खुल्या वर्गात : १८ ते २८
राखीव प्रवर्ग : १८ ते ३३
मराठा SEBC : १८ ते ३३
शिक्षण : बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष किंवा ( बँड पथक १० वी उत्तीर्ण)
उंची : मुलाची १६५ सेमी तर मुलीची १५५ सेमी,
SRPF : फक्त मुले १६८ सेमी,
ड्रायव्हर : मुलाचे १६५ सेमी तर मुलीचे १५८ सेमी,
बँड पथक : फक्त मुले १६३ सेमी
आवश्यक कागदपत्रे
– दहावी, बारावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
– महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
– शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
– आधार कार्ड
– कास्ट सर्टिफिकेट (ESBC, SC, ST, OBC, VJ, NT)
– नॉन क्रिमीलेयर (ESBC, SC, ST, OBC, VJ, NT)
– लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
– ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.
लेखी परीक्षेसाठी पहिला टप्यात लागणारे १०० गुण …
– मराठी २५, गणित २५, बुद्धिमत्ता २५, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २५
– (फक्त ड्राइव्हर)- मराठी २०, गणित २०, बुद्धिमत्ता २०, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी २०, वाहतूक २०)
मैदानी परीक्षेसाठी दुसरा टप्प्यात लागणारे ५० गुण …
१६०० मी = (५ मी. १० सेकंद – ३० गुण)
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १० गुण)
मुली :
८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)
१०० मी =(१४ सेकंद – १० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – १० गुण)
SRPF मैदानी १०० गुण…
फक्त मुले
छाती = ७९ सेमी. ती फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी.
५ किमी = (२५ मी – ५० गुण )
१०० मी = (११.५० सेकंद- २५ गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – २५ गुण)
ड्रायव्हर मैदानी ५० गुण…
मुले : छाती = ७९ सेमी. ती फुगवून ५ अधिक सेमीने वाढावी
१६०० मी = (५ मी १० सेकंद – ३० गुण )
गोळाफेक = (८.५० मीटर पेक्षा जास्त – १२ गुण)
मुली : ८०० मी = (२ मी. ५० सेकंद – ३० गुण)
गोळाफेक = (६ मीटर पेक्षा जास्त – २० गुण)
(ड्रायव्हर पदासाठी वाहन चालवणे ५० गुण)
क्रमशः...
(संदर्भ: www.mahabharati.in)
Comments
Post a Comment