Posts

Showing posts from June, 2021

समाजात वावरताना या गोष्टी आचरणात आणा

 आवर्जून आणि शांत पणे वाचावी अशी  post .व्यक्तिमत्व विकासासाठी समाजात वावरताना या गोष्टी आचरणात आणा:--* *1. एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळेच्या वरती परत परत फोन करू नका , कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळेस तुमच्या फोनपेक्षा महत्त्वाचे काम असेल.* *2. तुम्ही एखाद्याकडून उधार घेतलेले पैसे त्याने परत मागण्याअगोदर परत करा , तीच गोष्ट छत्री आणि पेनबाबत...* *3. एखादा तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायला नेतो तेव्हा मेनूतील महागडा पदार्थ ऑर्डर करू नका , शक्य असल्यास पार्टी देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा.* *4. तुझ अजून लग्न झालं नाही ? तू अजून घर बांधलं नाहीस ? असले समोरच्याला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका , कारण ती तुमची अडचण नाही.* *5. नेहमी आपल्यापाठुन येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष, कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुमचा कमीपणा होत नाही.* *6. तुम्ही मित्राबरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याचे भाडे त्याने दिले तर पुढच्या वेळेस आठवणीने तुम्ही भाडे द्या...हाच नियम पार्टीसाठीही आहे.* *7. सगळ्या राजकीय मतांचा आदर करा.* *8. कधीच कोणाच...

😓मीच तो वड🌳

पिंपळ,आंबा,फणस  सर्व रागावलेत माझ्यावर म्हणे काय जादू केली तू या महिला वर्गावर नटून थटून सर्वजणी येतात तुझ्या पारावर नाहीच भेटला तू तर फांदी ठेवतात पाटावर काय सांगू त्यांना वैतागलो मी या सणाला नमस्कार माझा त्या ऋषी मुनींना केला सण साजरा धरून विज्ञानाला महत्व प्राप्त करून दिले या भारत देशाला विज्ञान समजत नाही म्हणून उभे केले सावित्रीला वडाजवळ येऊन बसा फायदा होईल आरोग्याला माझ्या पानांमधून द्रव निघतो पावसाच्या सुरुवातीला स्त्रीयांचे आजार उभे राहणार नाहीत वाऱ्याला या सर्वच गोष्टी बाजूला राहिल्या आणि सावित्रीच्या लेकी पूजेला लागल्या झाड लावा माझे मी चोवीस तास  ऑक्सिजन देतो पटत नाही लोकांना म्हणे फारच जागा घेतो वर्षातून एकदाच लागते, कशाला हवे झाड? नाहीच मिळाले तर कुठून फांदी तोडून आण किंमत राहिली नाही या अक्षय वट वृक्षाची गरज आहे आता समाजाला झाडे लावण्याची बिघडलेल्या ह्या वसुंधरेचा तोल सावरण्याची मीच आहे तो सत्यवान ,ज्याला  गरज आहे  झाडे लावणाऱ्या सावित्रीच्या लेकींची. माझ्या प्रिय मैत्रिणी...वहिनी...बहिणी...मावशी आणि माम्यांनो...येत्या पौणिमेला वड पूजून सात जन्मी तोच वगै...

तरुणपिढी....फक्त ऑनलाईन

        पूर्वी पाटावर बसवून लहान बाळांना मऊ वरण भात हाताने भरवताना,  आई  चिऊ काऊ दाखवत , त्यांच्या गोष्टी सांगत असे. आता आईच्या हाताची जागा चमच्याने घेतली, पाटाची जागा खुर्चीने घेतली आणि चिऊ काऊंची जागा मोबाईलने घेतली! अगदी तीन चार महिन्याच्या बाळांना सुद्धा मोबाईल दिला जातो आणि वर कौतुकाने सांगतात की मोबाईल बघतच तो खातो. वर्षाच्या आत त्या बाळाला मोबाईलची इतकी सवय होते की आईला कळणार नाहीत इतक्या गोष्टी त्या मोबाईलमधून बाळ करू लागत. थोडं मोठं झाल्यावर, त्यातले सगळे फीचर्स त्याला हळूहळू समजू लागतात. इतक्या लहान वयापासून मोबाईलवरील गेम्सने त्या बाळाला अगदी चटकच लागून राहते. चार बाय दोनच्या जादुई डबड्याला ते आकर्षित होत असत.पण त्याच्या डोळ्यांवर, शरीरावर होणारा वाईट परिणाम घरातील कुणाला दिसत नाही. त्याचे मैदानी खेळ खेळण, मुक्त हालचाली करणं बंद होत. जणू एक व्यसन त्याला लागलेलं असत. हे प्रत्येक घरातील  उदाहरण आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.     आधीच लगत असलेल्या मोबाईलच्या व्यसनात.....  आता अधिकृतपणे भर पडलीये....सगळं ऑनलाईन!  कोविड मुळे...

दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग ६

वाचकहो,  दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही  काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. आज भाग सहावा आहे.  याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया या पोस्ट खाली नक्की कळवा.   १. मला उलट बोलू नकोस.  *   Don't talk back to me.  २. मी कोणाचेही ऐकत नाही.  *   I don't listen to anyone.  ३. व्यवस्थित बोल.  *   Talk with manners.  ४. मला त्रास देणे  बंद करा.  *   Stop annoying me.  ५. तु खूप स्वार्थी आहेस.  *  You are so selfish.  ६. तुमच्या संकटांना तोंड द्या.  *   Face your problems.  ७. स्वतः सामना करा.  *   Face your self.  ८. माझ्यावर उपकार करू नका.  *   Don't favour me.  ९. मला बोलू नका.  *  ...

दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग ५

वाचकहो,  दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही  काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. आज भाग पाचवा आहे.  याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया या पोस्ट खाली नक्की कळवा.  १.  मला वाटत, मी काहीतरी विसरलो.  *   I think, I forgot something.  २.  तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा.  *   Let me know if you need any help.  ३.  मी थोडासा चिंतीत आहे.  *   I am little worried. ४.  मी सकाळपासून बाहेर आहे.  *   I have been out since morning.  ५.  आपल्याला काहीतरी करावे लागेल.  *   We will have to do something.  ६.  मी दोन मिनिटात तयार होईन.  *   I will be ready in two minutes.  ७.  मला विचार करावा लागेल.  *   I...

दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग ४

  वाचकहो,  दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही  काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. आज भाग चौथा आहे.  याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया या पोस्ट खाली नक्की कळवा.  १. माझ्यासमोर काही अडचणी आहेत.  *  I have some problems.  २. तुम्ही विनाकारण चिंता करत आहात.  *  You are worrying for no reason.  ३. हे माझ्यावर सोडा.  *  Leave it to me.  ४. येथून जाऊ नका.  *  Don't go from here.  ५. तुम्ही कोणाला शुभेच्छा दिल्या.  *  Whom did you wish.  ६. तुम्ही काय निर्णय घेतला आहे ? *  What have you decided ? ७. जे काही होत, चांगल्यासाठीच होत.  *  Whatever happens, happens for the good.  ८. हे सगळं माझ्या चुकीमुळे झाले.  *  It was all by my mistake.  ९. मला बस...

दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग ३

  वाचकहो,  दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही  काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. आज भाग तिसरा आहे.  याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.  १. तू तुझ्या पालकांना कळवलं आहेस का ?  *  Have you told your parents ? २. मला किती वेळ वाट पहावी लागेल ?  *  How long do I have to wait ?  ३. तो नेहमीच तुझ्याकडे पाहतो.  *  He is always looking at you. ४. मी येथे आठवड्यातून एकदा येतो.  *  I come here once a week.  ५. मी अजिबात टि.व्हि पाहत नाही.  *  I doesn't wacth TV at all.  ६. तुम्ही एकमेकांना कसे ओळखता ?  *  How do you know each other ?  ७. तू बरोबर होतास हे मी मान्य करतो.  *  I admit that you were right.  ८. तिचा रंग गोरा आहे.  *  She has a fai...