दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग ५

वाचकहो, 

दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही  काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. आज भाग पाचवा आहे.  याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया या पोस्ट खाली नक्की कळवा. 


१.  मला वाटत, मी काहीतरी विसरलो. 

*   I think, I forgot something. 


२.  तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा. 

*   Let me know if you need any help. 


३.  मी थोडासा चिंतीत आहे. 

*   I am little worried.


४.  मी सकाळपासून बाहेर आहे. 

*   I have been out since morning. 


५.  आपल्याला काहीतरी करावे लागेल. 

*   We will have to do something. 


६.  मी दोन मिनिटात तयार होईन. 

*   I will be ready in two minutes. 


७.  मला विचार करावा लागेल. 

*   I will have to think. 


८.  आपल्याला सकाळी लवकर उठावे लागेल. 

*   We have to get up early in the morning. 


९.  तुला अभ्यास सुरू करायला पाहिजे. 

*   You should start studying. 


१०. मला काहीही करून ही परीक्षा पास व्हायची आहे. 

*    I have to pass this exam anyhow. 


११. तुझे काय मत आहे?

*    What's your opinion ?


१२. तू नक्कीच यशस्वी होशील. 

*    You have definitely  succeed.


१३. मला हे ऐकून आनंद वाटला. 

*    I'm glad to hear that. 


१४. तू बसून पाणी पिले पाहिजे. 

*    You should sit while drinking water.


१५. अनवाणी चालू नकोस. 

*    Don't walk barefoot. 


१६. जेवताना बोलू नकोस. 

*    Don't talk while eating. 


१७. माझ्याजवळ अजिबात पैसे नाहीत. 

*    I have no money. 


१८. तुला काहीच माहीत नाही का? 

*    Don't you know anything ?


१९. वेडा झाला आहेस का ? 

*    Have you gone mad ?


२०. मला समजले नाही. 

*    I didn't get that.


२१. मला माहित असायला हवे होते. 

*    I should have known. 


२२. त्याला काही अर्थ आहे का. 

*    Does that make any sense. 


२३. स्वतःकडे लक्ष द्या. 

*   Pay attention to yourself. 


२४. त्याला तुम्ही जबाबदार आहात. 

*    You are responsible for that. 


२५. मी तुम्हाला सोडणार नाही. 

*    I won't spare you. 


क्रमशः.....

(उर्वरित वाक्यांसाठी पुढील भाग नक्की वाचा) 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी