आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?
आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-19 नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतले पाहिजे की, गेली काही वर्षे जशी एखादी संसर्गजन्य आजाराची साथ पसरावी, त्याप्रमाणे आत्महत्यांची एक सुप्तसाथ आज आपल्या देशात पसरली आहे. भारतात दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आत्महत्या केल्याने होतो. त्यामधील निम्म्या म्हणजे साधारण एक लाख आत्महत्या या 15 ते 35 या वयोगटातील म्हणजे तरुणाईच्या असतात. आपण थोडे हळहळतो आणि काही दिवसांनी हे विसरून जातो. पण हा विषय खूप गंभिर आहे. 'युवाल नोवा हरारी' हा आजच्या जगातील एक महत्वाचा भाष्यकार असे म्हणतो की, ‘’युद्ध आणि दहशतवाद ह्यापेक्षा 'आत्महत्या’ हा आजच्या जगासाठी खूप अधिक महत्वाचा प्रश्न आहे. करोनाच्या साथीमुळे जे आर्थिक आणि सामाजिक परिणाम