Posts

संविधान दिन विशेष- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील भाषण

 भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्याच्या एक दिवस आधीचे संविधान सभेतील शेवटचे भाषण. …माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. …केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्यामते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच ...

वाणिज्य शाखेतील करिअर भाग 2 - कॉस्ट अँड वर्क अकौंटंट

Image
कॉस्ट अँड वर्क अकौंटंट (ICWA) वाणिज्य क्षेत्रात कॉस्ट अकौंटंट ही एक महत्त्वाची शाखा आहे. उत्पादन केलेल्या वस्तूंची किंमत ठरवणं हे खूपच कौशल्याचं आणि हुशारीचं काम आहे. कारण बाजाराचा ट्रेन्ड काय आहे ? त्या उत्पादनाच्या इतर प्रतिस्पर्थ्यांनी त्यांच्या उत्पादनाची किती किंमत ठेवली आहे ? त्यांच्यापेक्षा किंमत कमी ठेवूनही फायदा होईल का ? त्या किंमतीतून खर्च वजा जाता उत्पादकाला नफा होणार आहे नं ? या सगळ्याचा कॉस्ट अकौंटंटचा अभ्यास असावा लागतो. त्यासाठी बाजाराची आणि उत्पादनाची संपूर्ण माहिती त्याला असावी लागते. तरच तो किंमत ठरविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा विचार करू शकतो आणि त्यावर नियंत्रणही ठेवू शकतो. हेच त्याचं मुख्य काम आहे.  अर्थात केवळ उत्पादनाची किंमत ठरवणंच नाही तर त्या उत्पादनाबरोबर दिल्या जाणाऱ्या सेवेचं मूल्यही त्यालाच ठरवायचं असतं. मग त्यासाठी उत्पादनाला लागणारा कच्चा माल, त्यावरचा खर्च, लागणारी यंत्रसामुग्री, यंत्रांची दुरुस्ती, त्याचा खर्च, कामगारांचं वेतन, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा खर्च, कारखान्याच्या जागेचा खर्च, वीज-पाण्याचा खर्च, मार्केटिंगचा खर्च, विक्री व्यवस्थेच...

वाणिज्य शाखेतील करिअर : चार्टर्ड अकौंटंट

Image
वाणिज्य क्षेत्र निवडल्यानंतर अनेकांचा कल 'सी. ए.' करण्याचाच असतो. व्यापारी संस्था, वित्त संस्था, सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांचे आर्थिक व्यवहार ठीकठाक आहेत किंवा नाही हे चार्टर्ड अकौंटंट पाहतो. त्याचप्रमाणे अकौंटंट विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखभाल ठेवण्याचे कामही त्याला पार पाडावे लागते. वर्षभरातील व्यवहारांच्या पावत्या आणि बिले यांचं निरीक्षणाचे कामही करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. योग्य त्या लेखा वह्यांमध्ये पैशाच्या व्यवहाराची नोंद केली जाते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याप्रमाणेच संस्था आपले कर, परवाने याबाबतीत भरावे लागणारे पैसे योग्य वेळी भरले जातात अथवा नाही, याची काळजी घेतो. वार्षिक आर्थिक परिपत्रक तयार करून त्यात जमा, खर्च याविषयी नोंदी करतो. चार्टर्ड अकौंटंटकडून संस्थेच्या लेखा परीक्षणास कायद्याने संमती दिली आहे. त्याने एकदा हे परीक्षण केले की, त्या संस्थेचा वार्षिक आर्थिक व्यवहार मान्य केला जातो. 'सी. ए.' हा व्यवसाय म्हणूनच खूप प्रतिष्ठेचा समजला जातो. त्याचप्रमाणे स्वतंत्र व्यवसायही करता येतो. शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकौंटंट होण्यासाठी फाउ...

खेळ

मनोरंजन वा शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा. खेळण्याची प्रवृत्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. लहान बालकापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच खेळांची आवड असते. अगदी प्राथमिक अवस्थेतील मानवसमाजातही अनेक प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार, कुस्ती, द्वंद्वे, कवड्या, सोंगट्या, फासे इ. खेळ ते खेळत. प्राचीन ग्रीक लोक अनेक प्रकारचे खेळ खेळत. खेळांना नियमित व सुसंघटित असे स्वरूप ग्रीक लोकांनीच दिले. त्यांच्या जीवनात खेळांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. ग्रीक लोकांच्या वैभवकालात त्यांचे ऑलिंपिक, नेमियन, पायथियन, इस्थमियन इ. नियतकालीन सामने प्रसिद्ध होते. या सामन्यांत भाग घेणे व विजय मिळविणे हे मानाचे समजले जाई. या सामन्यांत धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टीयुद्ध इ. खेळांचा समावेश असे. रोमन लोकांतही खेळांना प्राधान्य होते. आपल्या भारतात प्राचीन वैदिक कालात, तसेच रामायण व महाभारत कालात द्युत, फासे, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती इ. खेळ प्रचलित होते. भारताप्रमाणे ईजिप्त, चीन, जपान इ. देशांतही सोंगट्या, गंजीफा, बुद्धिबळे, शतरंज यांसारखे खेळ फा...

मनाचे चार्जिंग

(अतिशय सुंदर पध्दतीने मन कसं रिचार्ज करायच हे पटवून दिलं आहे अन् पटण्यासारखं आहे.)👇 ---- मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच. रविवार...निवांत, आरामाचा दिवस...आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती.  सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज *'लो बॅटरी * '.. चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती. अरे बापरे...?? काय करावे तेच सुचेना... मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो. *माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”* “नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले. “मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणि चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. *मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतो,इतके त्याला जपतो.. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?”* पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते. “मन...

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Sttaf Selection Commision) मार्फत 1920 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ● पद संख्या  : 1920 • पदाचे नाव  : नर्सिंग ऑफिसर, सिनियर रिसर्च असिस्टंट, टेक्निकल ऑफिसर, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, एग्रीकल्चर असिस्टंट, सिनियर टेक्निकल ऑफिसर, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, स्टाफ कार ड्राइव्हर, मेडिकल अटेंडंट, केयर टेकर, डाटा प्रोसेसिंग असिस्टंट, फोटो आर्टिस्ट, फील्ड अटेंडंट, रिसर्च असोसिएट, टेक्निकल असिस्टंट, सर्व्हेअर, टेक्निकल ऑपरेटर, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ • शैक्षणिक पात्रता  : दहावी, बारावी, पदवी (मुळ जाहिरात पाहावी ‌.) ● वयोमर्यादा  : 91 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25/25/30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] ●अर्ज शुल्क  : पुरुष उमेदवार - 100 रूपये,  [SC / ST / PWD / ExSM / महिला - कोणतीही फी नाही. • अर्ज करण्याची पद्धत  : ऑनलाईन • अधिकृत वेबसाईट  :  https://ssc.nic.in/ ● जाहिरात पहाण्यासाठी   खालील लिंकवर क्लिक करा. https://drive.goog...

भारतीय डाक विभागात 38,926 जागांची भरती

  भारतीय डाक विभागात एकूण 38,926 ग्रामीण डाक सेवक (GDS) BPM/ABPM/ डाक सेवक म्हणून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  अर्ज https://indiapostgdsonline.gov.in. वर ऑनलाइन सबमिट करावयाचा आहे इतर कोणत्याही माध्यमातून सबमिट केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज सबमिट केल्यास अर्ज नाकारला जाईल. ज्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत त्यांचा तपशील जहिरातीमध्ये सविस्तर देलेला आहे. भारतात एकूण जागा : ३८९२६ महाराष्ट्रात एकूण जागा : ३०२६  शैक्षणिक पात्रता : 1. कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10 वि उत्तीर्ण प्रमाणपत्र.  2. सर्व GDS पदांसाठी सायकल चालवणं येणं आवश्यक. जर स्कुटर किंवा मोटारसायकल चालवता असेल तर हे देखील सायकलच्या ज्ञानात समाविष्ट केला जाईल.  वयोमर्यादा :  १८ ते ४० (SC/ST साठी ५ वर्ष सुट, OBC साठी ३ वर्ष सुट) अर्ज शुल्क (Fee) :  100 रुपये. (सर्व-महिला उमेदवार, SC/ST उमेदवार, PWD उमेदवार आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना अर्जासाठी फी नाही) 'post office...