स्वामी विवेकानंद पुण्यतिथी विशेष
एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकाण्ड विद्वान होते. स्वामी विवेकानंदानी ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञान योग’ असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही स्वामी विवेकानंद महान कार्याची कथा सांगते.
स्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला जीवन शिकवले , एक तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे असलेले स्वामी विवेकानंद विचार खूप प्रभावी होते, जर एखाद्याने त्यांच्या जीवनात त्यांचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होते. एवढेच नाही तर विवेकानंदांनी लोकांना त्यांना प्राप्त झालेल्या आध्यात्मिक विचारींनी सुद्धा लोकांना प्रेरित केले, त्यातील काही विचार खालीलप्रमाणे :
१. उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.
२. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.
३. हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.
४. अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
५. महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
६. जर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे. जर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.
७. बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे.
८. शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
९. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील.
१०. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळतनाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
११. चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
१२. स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
१३. असं कधीच म्हणू नका की,मी करू श नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.
१४. जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
१५. शक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे. प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे.
आज अशा महान विचारवंत विचारवंतांची पुण्यतिथी. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...🙏🙏
Comments
Post a Comment