Posts

Showing posts from May, 2021

दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग २

वाचकहो,  दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही  काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. आज भाग दुसरा आहे.  याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.  १. अंधार पडायच्या आधी परत या.  *  Come back before it is dark.  २. तुम्हाला काय करायचे ते करा.  *  Do whatever you want to do.  ३. मला हेच माहित करायचे होते.  * That's what I wanted to know.  ४. माझा मुलगा पाच वर्षांचा झाला आहे.  *  My son has turned 5.  ५. मला जवळून पाहू द्या.  *  Let me get a closer.  ६. तो तुझा काय लागतो?  *  Who is he to you ? ७. मला बोलायला लावू नका.  *  Don't make me say it.  ८. सर्वांनाच अडचणी असतात.  *  Everyone has problems.  ९. सर्वकाही चांगले वाटत आहे.  *  Everyth...

दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये - भाग १

वाचकहो,  दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आजपासून काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. प्रत्येक भागात 20 वाक्ये दिली जातील. याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.  १. सर्वकाही ठीक होईल.  *  Everything will be ok.  २. मी माझे शब्द परत घेतो.  *  I take my words back.  ३. कृपया एकावेळी एकच जण बोला.  *   Please speak one at a time.  ४. तुम्ही माझ्यावर नाराज आहात का ?  *  Are you offended with me ? ५. माझी काय चूक होती?  *  What was my mistake ?  ६. माझे काम अजून संपलेले नाही.  *  My work is not yet over.  ७. तू मला झोपेतून का उठविले नाहीस ? *  Why didn't you wake me up ?  ८. मनापासून काम करा.  *  Work whole heartdly.  ९. तुम्ही दिलेले वचन पूर्ण करा....

विचारांशी मैत्री

         आपली मैत्री व्यक्तीशी होत नाही त्या व्यक्तीच्या विचारांशी कारण आपली मैत्री विचारांशी होत असते ,आपल्यासारखे विचार करणारे आपल्याला आवडतात पण,समोरची व्यक्ती आणि तिची विचार एक सारखे असतील असं नाही ना ,कधी कधी व्यक्ती दुसऱ्याचा विचार मनात घेऊन बोलत असते तो विचार त्याचा स्वतःचा नसतो, स्वतःचा विचारही असावा आणि त्यावर माणसाने ठाम ही राहावं, क्वचित असे लोक असतात की त्यांचे विचार आणि त्यांचं वागणं एकसारखाचं असतं, जगाला दाखवण्यासाठी आपले विचार किती चांगले आहे हे एका बाजूला आणि आपलं आचरण किती चुकीचा आहे हे एका बाजूला, *जे विचार तुम्हाला बदलण्यास भाग पडतात, तुमच्यामध्ये परिवर्तन घडवतात तुम्हाला विचार करण्याची वेळ आणतात असे  विचार.*          माणूस विचाराने समृद्ध ही असेल पण कधीकधी त्याचा आचरणही त्याच्या विचारांचा सारखा असेल असं नसतं, म्हणूनच असं वाटतं की आपली माणसांच्या विचारांशी मैत्री होत असते, ती व्यक्ती काय करते, कशी दिसते ,कशी आहे यामध्ये काहीही उत्सुकता नसते पण,समोरच्या व्यक्तीच्या विचारांनी आपले विचार नकळतच बदललेले असतात, एखादी अन...

आद्य मानसोपचार तज्ञ बुद्ध!

Image
 

हे जीवन सुंदर आहे

गरीब असो की श्रीमंत, नोकरदार असोत की व्यापारी, भारतातील असोत की परदेशांतील... दररोजच्या जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतोच. प्रत्येकाच्या वाट्याला सुख-दुःख येतच असतात. सुखात असताना आपण त्याबद्दल बेफिकीर असतो आणि दुःखात असताना जीवनाला दोष देत असतो. चिंता, कटकट, दुःख सर्वांनाच असतात. मात्र, केवळ त्यांचाच पाढा वाचत बसल्याने दिवस पालटत नसतात. सत्यम्, शिवम्, सुंदरम् ही भारतीय तत्त्वज्ञानाची त्रिसूत्री आहे; म्हणून जीवन आनंदाने जगावे आणि शेवटच्या क्षणाकडे तृप्त मनाने वाटचाल करावी. वृद्धपणी कशाचीही खंत वाटता कामा नये. ‘इतकी बडी दौलत, खैरात में नाही मिलती,’ असे म्हणत एका उर्दू शायरने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच विशद केला आहे. जगभरातील संत व महात्मे यांना चराचर सृष्टी सुखात राहावी असेच वाटत आले आहे. त्यांना स्वतःसाठी काहीच नको होते. वैयक्तिक सुखःदुःखाच्या चक्रातून ते केव्हाच मुक्त झालेले होते. ज्ञानेश्वरांनी शेवटी पसायदानात, सर्वजण आनंदी व्हावेत हेच मागणे मागितले. बहुतेक संत गरीब होते. ज्ञानेश्वरादी भावंडांजवळ स्वतःच्या मालकीचे काहीही नव्हते. तुकाराम महाराजांच्या संसारातील गरिबी तर प्र...

परिवर्तनाला सामोरे जा

Image
 

मानसशास्त्रज्ञांकडून काही सूचना

१. विषाणूच्या (व्हायरस) बातम्यांपासून स्वतःला दूर ठेवा. (याबद्दल आपल्याला जे जे माहिती असायला हवं ते एव्हाना माहिती झालेलं आहे). २. कितीजण दगावले ते पाहत बसू नका. ही एखादी क्रिकेट मॅच नाही की ज्याचा लेटेस्ट स्कोर काय झाला ते तुम्हाला माहिती असायलाच हवं, त्यामुळे याकडे लक्ष देणे पूर्णपणे टाळा. ३. इंटरनेटवर अधिक माहिती शोधू नका, याने तुमचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते.  ४. गंभीर मेसेजेस इतरांना पाठवणे त्वरित थांबवा. तुम्ही जितके मनाने खंबीर असाल तितकीच खंबीर समोरची व्यक्ती असेलच असे नाही (याने मदत तर होणार नाहीच उलट तुम्ही समोरच्याला डिप्रेशनमध्ये टाकू शकता). ५. शक्य झाल्यास घरात शांत मंद आवाजात आवडते संगीत ऐका. लहानग्यांशी खेळ खेळा, त्यांना छान छान गोष्टी सांगा भविष्यात काय काय करणार याविषयी चर्चा करा.  ६. आयुर्वेदिक काढा, अमृतप्राश, गरम सूप, हळदीचे दूध, ताजे जेवण यांचा समावेश असुद्यात. ७. स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळा. आयुर्वेदिक औषधांचा सुपरिणाम सर्वज्ञात आहे, त्यामुळे आपल्या ओळखीच्या आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. (घरगुती आयुर्वेदिक उपचार किंवा ऐकीव औषधे टाळा.) ८. तुमचा स...