दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग २

वाचकहो, 

दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही  काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. आज भाग दुसरा आहे.  याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 


१. अंधार पडायच्या आधी परत या. 

*  Come back before it is dark. 


२. तुम्हाला काय करायचे ते करा. 

*  Do whatever you want to do. 


३. मला हेच माहित करायचे होते. 

* That's what I wanted to know. 


४. माझा मुलगा पाच वर्षांचा झाला आहे. 

*  My son has turned 5. 


५. मला जवळून पाहू द्या. 

*  Let me get a closer. 


६. तो तुझा काय लागतो? 

*  Who is he to you ?


७. मला बोलायला लावू नका. 

*  Don't make me say it. 


८. सर्वांनाच अडचणी असतात. 

*  Everyone has problems. 


९. सर्वकाही चांगले वाटत आहे. 

*  Everything  looks fine. 


१०. पोहचल्यावर मला फोन करा. 

*   Call me when you get there. 


११. माझ्या प्रेमात पडू नकोस. 

*   Don't fall in love with me. 


१२. जास्त पैसे खर्च करू नकोस. 

*   Don't spend too much money. 


१३. माझ्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. 

*   Don't try to sweet talk to me. 


१४. तुला माझे नाव आठवत नाही का ?

*   Don't you remember my name ?


१५. स्वप्ने कधीकधी खरी होतात. 

*  Dreams sometimes come true. 


१६. सगळ्यांनी मला मदत केली. 

*   Everybody helped me. 


१७. सर्वजण माझ्याकडे पाहत होते. 

*   Everyone was looking at me. 


१८. सर्वकाही किती महाग आहे !

*   Everything is so expensive !


१९.  येथे नेमकं घडलं तरी काय ?

* Exactly what happened here ? 


२०. तू कधी भूत पाहिलस का ? 

*  Have you ever seen a ghost ? 


क्रमशः.....

(उर्वरित वाक्यांसाठी पुढील भाग नक्की वाचा)

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी