दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये - भाग १
वाचकहो,
दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आजपासून काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग सादर करीत आहोत. प्रत्येक भागात 20 वाक्ये दिली जातील. याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
१. सर्वकाही ठीक होईल.
* Everything will be ok.
२. मी माझे शब्द परत घेतो.
* I take my words back.
३. कृपया एकावेळी एकच जण बोला.
* Please speak one at a time.
४. तुम्ही माझ्यावर नाराज आहात का ?
* Are you offended with me ?
५. माझी काय चूक होती?
* What was my mistake ?
६. माझे काम अजून संपलेले नाही.
* My work is not yet over.
७. तू मला झोपेतून का उठविले नाहीस ?
* Why didn't you wake me up ?
८. मनापासून काम करा.
* Work whole heartdly.
९. तुम्ही दिलेले वचन पूर्ण करा.
* Fulfill the promise that you made.
१०. मी तुमच्याविषयी बरेच ऐकून आहे.
* I have heard a lot about you.
११. मला पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले का ?
* Are you surprised to see me ?
१२. कृपया तुम्ही येथे याल का ?
* Would you please come here ?
१३. व्यवस्था माझ्यावर सोडा.
* Leave the arrangement on me.
१४. सर्वांचा विश्वास करणे शक्य नाही.
* Everybody can't be trusted.
१५. ही फक्त एक अफवा आहे.
* It is just a rumour.
१६. आता दुसरा पर्याय उरलेला नाही.
* There is no way left now.
१७. मला असे करायला आनंद वाटेल.
* I will be glad to do so.
१८. माझ्यावर तुमचा राग काढू नका.
* Don't vent your anger on me.
१९. आता पश्चाताप करून काय फायदा आहे ?
* What is the use of repenting now ?
२०. तुम्ही का ओरडत आहात ?
* Why are you shouting ?
It is really useful sentences Mam.
ReplyDeleteIt is really useful sentences .
ReplyDeleteIt is really useful sentences .
ReplyDeleteVery informative
ReplyDeleteVery informative
ReplyDelete3 jun 2021at 3.00 very informative
ReplyDelete