विचारांशी मैत्री

         आपली मैत्री व्यक्तीशी होत नाही त्या व्यक्तीच्या विचारांशी कारण आपली मैत्री विचारांशी होत असते ,आपल्यासारखे विचार करणारे आपल्याला आवडतात पण,समोरची व्यक्ती आणि तिची विचार एक सारखे असतील असं नाही ना ,कधी कधी व्यक्ती दुसऱ्याचा विचार मनात घेऊन बोलत असते तो विचार त्याचा स्वतःचा नसतो, स्वतःचा विचारही असावा आणि त्यावर माणसाने ठाम ही राहावं, क्वचित असे लोक असतात की त्यांचे विचार आणि त्यांचं वागणं एकसारखाचं असतं, जगाला दाखवण्यासाठी आपले विचार किती चांगले आहे हे एका बाजूला आणि आपलं आचरण किती चुकीचा आहे हे एका बाजूला, *जे विचार तुम्हाला बदलण्यास भाग पडतात, तुमच्यामध्ये परिवर्तन घडवतात तुम्हाला विचार करण्याची वेळ आणतात असे  विचार.* 

        माणूस विचाराने समृद्ध ही असेल पण कधीकधी त्याचा आचरणही त्याच्या विचारांचा सारखा असेल असं नसतं, म्हणूनच असं वाटतं की आपली माणसांच्या विचारांशी मैत्री होत असते, ती व्यक्ती काय करते, कशी दिसते ,कशी आहे यामध्ये काहीही उत्सुकता नसते पण,समोरच्या व्यक्तीच्या विचारांनी आपले विचार नकळतच बदललेले असतात, एखादी अनोळखी व्यक्ती असते  तिला आपण कधी पाहिलेली नसते पण तिचे आणि आपले विचार बोलण्यातून जुळत असतात फेसबुक ,व्हाट्सअप, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांशी मैत्री होते ज्यांना आपण कधी पाहिलेही नसतं पण आपल्या बोलण्यातून आपली एकमेकांच्या विचारांशी मैत्री झालेली असते, 

          *आपल्या पुस्तकातून,आपल्या विचारातून हजारो लोकांना सकारात्मक संदेश देणारे परंतु स्वतःच्या जीवनामध्ये त्या विचारांचा अवलंब करत नाही असे चेहऱ्यावर मुखवटे धारण करणारे  काही लोक पाहिले की दुःख होतं जे सकारात्मक विचार तुम्ही दुसऱ्यांमध्ये पेरता त्याचं आचरण स्वतःच्या जीवनामध्ये करत नाही मग दुनियाने तुम्हाला किती सलाम केला तरीही तुमचं मन तुम्हाला सलाम करत नाही आणि अशी खोटी प्रतिष्ठा घेऊन बरेच लोक जगत असतात.* 

           *माणसाने नेहमी पारदर्शी असावे जे मनात ते विचारात आणि जे विचारात ते वागण्यात तरच प्रत्येकाला आत्मिक समाधान आणि सुख मिळेल नाहीतर खोटी प्रतिष्ठा काय कामाची?* माणसांशी मैत्री होत नसते तर त्यांच्या विचारांशी आपली नाळ जुडली की मैत्री होत असते

       *तुमचे विचार तुमच्या हृदयाच्या गाभाऱ्यातून  बाहेर पडत असतात आणि ते समोरच्याच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतात आणि आपल्या हृदयामध्ये प्रत्यक्ष आपला परमेश्वर असतो म्हणूनच आपले चांगले सकारात्मक विचार इतरांच्या मनाला प्रेरणा देऊन जातात जसं की शेतामध्ये बी पेरावं लागतं पण गवत (तण) हे कुठेही उगवतं तसंच सकारात्मक विचार हे अंतर्मनावर पेरावे लागतात आणि नकारात्मक विचार हे गवतासारखे सगळीकडेच असतात, तुम्ही तुमच्या अंतर्मनात चांगल्या विचारांचं बी लावलं की त्याचा मोठा वटवृक्ष होईल आणि त्याच्या फळाचा फुलाचा आस्वाद घेण्यासाठी हजारो लोक ,प्राणी, पक्षी तुमच्या भोवती जमा होतील त्यामुळे तुमचे सकारात्मक विचार हे खूप महत्त्वाचे आहेत*


- ©️®️अमिता भिलारे लोणकर

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी