भावनांची गडबड
माझ्या ओळखीतले एक नवरा बायको सध्या कोविड पॉझिटिव्ह आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बिल्डिंग मध्येच दोन-तीन फॅमिलीने एकत्र जमून गेट-टुगेदर केलं आणि नेमकं त्या पार्टीतले काहीजण पॉझिटिव्ह आले. त्यातच हे दोघे सुद्धा होते. सुदैवानी मुलगा मोठा आहे, तो निगेटिव्ह आहे. तसंच दोघांनाही काही त्रास नव्हता. पंधरा दिवस दोघं घरातच क्वारनटाईन झाले. यात त्यांची प्रचंड भांडणं झाली. 'त्या पार्टीला यायचा तू मला आग्रहच का केला? 'असं म्हणून बायको नवऱ्यावर चिडत राहिली. ' आपण कुठून त्या पार्टीला गेलो? ' असे विचार सतत त्या नवऱ्याच्या मनात येत होते आणि त्याला प्रचंड नैराश्य आलं. त्यांच्याशी वेगवेगळं आणि एकत्रितपणे फोनवर बोलताना माझ्या लक्षात आलं राग, अपराधीपणा, नैराश्य, एकटेपणा अशा अनेक नकारात्मक भावनांचा त्यांना त्रास होत होता. दोघं सतत नकारात्मक विचार करत होते. हे स्वाभाविकच आहे. कारण आपल्यावर कुठलंही संकट येतं, समस्या येतात तेव्हा नकारात्मक विचार सुरु होतात. ते बरेचदा प्रश्नार्थक असतात. माझ्याच बाबतीत का? माझं नशीब असं कसं? तू का मला तिकडे नेलंस? मी त्याचं का ऐकलं? मी का त्यावेळी तिकडे गे...