जागतिक पुस्तक दिन विशेष
विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हंटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला. स्पेनमध्ये मिगेल डे सर्व्हांटिसच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये युनेस्कोची सर्वसाधारण सभा झाली, ज्यात जगभरातील लेखकांना आदर आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पुस्तकांमध्ये रस निर्माण करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.
कॉपीराइट म्हणजे काय?
कॉपीराइट कायदेशीर संज्ञा आहे. एखाद्या रचनेचा मूळ लेखक किंवा निर्मात्याचे त्या रचनेवर मर्यादित काळासाठी विशिष्ट हक्क असतात. ज्या कंपनीस किंवा ज्यास तो ते वापरण्याचे अधिकार देतो, ती व्यक्ती ही रचना व्यावसायिक किंवा इतर कारणांसाठी वापरू शकते. कधीकधी निर्माता प्रकाशन संस्थेशी करार करतो. नंतर कॉपीराइटचा अधिकार एका विशिष्ट प्रकाशनाकडे जातो, त्या प्रकाशनाव्यतिरिक्त अन्य कोणी ती रचना वा साहित्य वापरू शकत नाही. जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
जागतिक पुस्तक दिवस २०२१ थीम
दरवर्षी, जागतिक पुस्तक दिनाची एक विशिष्ट संकल्पना असते. कोविड - 19 लक्षात घेऊन यावर्षीची मध्यवर्ती थीम 'To share a Story' ही आहे. वेगवेगळ्या कथा आपल्याला विविध प्रकारचे संदेश देतात. सामाजिक, वैचारिक प्रबोधनाचे कार्य या कथा करतात. सध्या कोविड महामारीमुळे सर्वांमध्ये जे भीतीदायक वातावरण आहे, त्यातून व्यक्तीला भयमुक्त करणे, प्रबोधन करणे, मनोरंजक गोष्टीतुन सकारात्मकता निर्माण करणे यासाठी कथा एकमेकांना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉन अखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात.
संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स
खूपच छान
ReplyDeleteThank you sir
ReplyDelete