Posts

खरे संस्कार

       मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, "बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आज पर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल."  त्याची मुलगी सारा म्हणाली, "बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही कांहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवऊं द्या."  थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला.  तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यास...

स्त्रियांची एनर्जी

प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते, ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे... आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो?  तो फक्त असतो त्याच्या असण्यानंच खूप काही होतं, तशीच ही ऊर्जा केवळ "असण्याची ऊर्जा" आहे. ही एनर्जी घरात असल्यानं घरात स्नेह ओलावा,चैतन्य आहे,घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. तिनं काही करणं हे अतिशय सुंदर एक्स्ट्रा काम आहे, एनर्जीचा उपयोग करुन ती स्वयंपाक करते , घर सजवते पण कधी तिनं ही एनर्जी वापरुन काही केलं नाही तरी तिची किंमत कमी होत नाही, ती एनर्जी घरात आहे आणि ते असणंच एक समाज देणं आहे. घरासाठी तर वरदान आहे... याचा अनुभव प्रत्येकाला आहे , एखाद्या एकट्या रहाणा️ऱ्या  पुरुषाचं घर, बॅचलरच्या रुमचं उदाहरण घेऊ, तिथे गेल्यावर कसं वाटतं , ते अनुभवा. तिथे काहीतरी उणिव वाटते ती कसली? तर  फेमिनाईन एनर्जीच तिथं नाही.... किंवा  घरातली आई/ पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर घरात कसं वाटतं ते पण तपासा. दोन द...

शिक्षणाचे बदलते रूप

Image
 

सामाजिक आरोग्य

सामाजिक आरोग्य म्हणजे आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे. सामाजिक प्रश्न किंवा अडचणी सोडवण्याचा आपणहून प्रयत्न करणे असे म्हणता येईल. आपले आरोग्य खालील गोष्टींवर अवलंबून असते. अनुवंशिकता सभोवतालचे वातावरण व जीवन जीवन पद्धती आहार व पोषण आरोग्य व औषधोपचार सेवा समाजाची आर्थिक स्थिती इतर गोष्टी जसे शिक्षण, शेती, उद्योगधंदा, ग्रामीण विकास इ. सामजिक आरोग्य चांगले नसणे म्हणजे (आजार) अगदी सहजपणे नेहमीची कामे करता न येणे किंवा त्यात अडचणी येणे म्हणजे आजार किंवा रोग. लक्षणे नेहमीची कामे न करता येणे, म्हणजे घरातील कामे, शेतीतील कामे, व्यवसायातील कामे नीट विचार न करता येणे मन गोंधळून जाणे लक्ष न लागणे निर्णय घेता न येणे निरुत्साही वाटणे भांडणे काढणे, वैर निर्माण करणे सामाजिक कार्यक्रमांमध्ये उदा. लग्न समारंभ, मेळावे, यात्रा, नातेवाईकांच्या गाठीभेटी इ. गोष्टी नकोशा वाटणे. उपाय सकस आहार घेणे स्वच्छता राखणे करमणूक किंवा मनोरंजन साधने यांचा वापर करणे. व्यायाम व विश्रांती समाजामध्ये मिसळणे इतरांच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होणे ताण-तणाव...

मॅनेज युअर अँगर (राग व्यवस्थापन)

Image
राग ही खूप प्रखर; पण सामान्य भावना आहे. रागाची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलत असते. रागाची तीव्रता खूप वाढली, तर रागाचे रूपांतर संताप आणि हिंसेमध्ये होऊ शकते. ही गोष्ट राग येणाऱ्या आणि राग आलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे रागाचे योग्य वेळी, योग्य रितीने व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट आहे. आजच्या गतिमान जीवनशैलीत ताण, वैफल्य, भिती, असुरक्षिततेची जाणीव, दहशत, अपेक्षाभंग इत्यादी गोष्टींचे प्रमाण वाढलेले आहे. याचा परिणाम 'राग' या सर्वात जास्त नकारात्मक असलेल्या भावनेच्या प्रदर्शनातून व्यक्त होत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर 'राग' ही भावना जन्माला येते. विविध वयांतील अनेक माणसे रागावर नियंत्रण कसे करावे, याची विचारणा करत असतात. यावरूनच ही भावना खूप प्रखर असल्याचे लक्षात येते. म्हणूनच योग्य वेळी, योग्य रितीने रागाचे व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट म्हणून आत्मसात करण्यास काहीच हरकत नाही. त्याची सुरुवात आपण प्रथम रागाची कारणे शोधून करूया. ही कारणे पुढील प्रमाणे विभागू शकतो. * रागास जबाबदार व्यक्तींमधील अंतर्गत घ...

मेड फॉर इच अदर

 कागदावर जुळलेली पत्रिका आणि  काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे. सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं. निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा? त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच..त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल तरच संसारात पाऊल टाकावं. अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे. कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे तेलकट प्रश्न विचारा.. या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर म...

स्वतःला वचन द्या

मित्र/मैत्रिणींनो आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आनंदी आणि समाधानी राहणं आपल्याच हाती असत, परंतु आपण मात्र परिस्थितीला दोष देत बसतो. चला तर जाणून घेऊयात स्वतः अंगिकारता येतील असे काही मूलमंत्र.... ════════════════════ 🌿 एवढं मजबूत मन बनवायचं आहे की कोणतीही घटना, परिस्थिती तुमच्या मानसिक शांतीला ढळू देणार नाही. 🌿 मी ज्या ज्या व्यक्तींना भेटणार त्यांच्याशी आरोग्य, आनंद, समृद्धी बद्दल नक्की बोलणार. 🌿 माझ्या मित्र/मैत्रिणींशी अशाप्रकारे बोलणार की त्यांना जाणवून देईल की त्यांच्यात ही काहीतरी चांगलं आहे. 🌿 आपल्या आयुष्यातील आधीपासून चांगल्या असणाऱ्या गोष्टींबद्दल रोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करणार. उदा. माझ्यावर प्रेम करणारे आई वडील, मित्रमंडळी आहेत, माझं आरोग्य चांगले आहे, मी माझे ध्येय प्राप्त करण्याकरिता योग्य प्रयत्न करत आहे त्याबद्दलमी आभारी आहे. हे लिहत चला वही मध्ये रोज किंवा मनात म्हणू शकतात तुम्ही ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञ आहात त्याबद्दल. 🌿 विचार करायचा झाला तर तो चांगलाच करणार, आणि चांगल्यासाठीच करणार, त्यातून चांगलं काहीतरी घडणार आहे म्हणून करणार. 🌿 इतरांच्या यशाब...