Posts

Showing posts from June, 2023

तलाठी भरती - अर्ज भरणेची प्रक्रिया सुरू

 सविस्तर माहितीसाठी येथे Click करा. 👉  Open महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती  २०२३ . ⇒  पदाचे  नाव :   तलाठी . ⇒ एकूण  रिक्त  पदे :   4644  पदे . ⇒  नोकरी  ठिकाण :  महाराष्ट्र. ⇒  शैक्षणिक  पात्रता :  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ⇒  वयोमर्यादा :   खुला प्रवर्ग:  18 ते 38 वर्षे,  मागास प्रवर्ग:  18 ते 43 वर्षे. ⇒ वेतन/ मानधन : रु, 25,500/- ते रु. 81,100/-. ⇒ अर्ज करण्याची पद्धत :  ऑनलाइन. ⇒  अर्ज  शुल्क :  खुला प्रवर्ग :  ₹1000/- ,   राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) :  ₹900/- . ⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख:   26 जून २०२३ . ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख:   17 जुलै २०२३.

नाहीतर पंचविशीत हार्ट अँटॅक हा ट्रेंड होईल!!

 हजारो ह्रदयविकारी रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे जीव वाचविणार्या ४१ वर्षांच्या डाॅ. गौरव गांधी यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील जामनगरात हे घडले.  माझ्याकडे २० ते ३० वर्ष वयाचे तरूण ब्लड प्रेशर घेऊन मोठ्या संख्येने येत आहेत. या वयात रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू करायला लागाव्यात असे का घडत आहे? डाॅ. गौरव गांधी यांना व्यसन नव्हते. रात्री छातीत दुखू लागल्यावर त्यांनी, ईसीजी करून घेतला जो नाॅर्मल आला. पित्त समजून घरी परतल्यावर काही तासानंतर ते बेशुद्ध झाले, व्हेंटिलेटरवर ठेवले. पण उपयोग झाला नाही. पोस्ट माॅर्टेम मध्ये ह्रदयात कोणतेही बदल दिसले नाहीत. कारण लक्षणे उद्भवणे आणि मृत्यू यामधील वेळ अत्यंत कमी असेल तर ह्रदयात खुणा सापडत नाहीत. ७ तासाच्या कालावधीत त्या मिळतात.  ह्रदयविकार झटक्यांच्या ३०% केसेसमध्ये ईसीजी नाॅर्मल येतो. अशावेळी हाॅस्पिटलात पुढे २४ तास रहाणे अनिवार्य ठरते. ईसीजी ठराविक अंतराने करणे आणि रक्तातील ट्रोपोनीन व क्रियाटीनीन व अन्य चाचण्या  तपासाव्या लागतात.  तरूण वयात ह्रदयविकार वाढले आहेत कारण स्ट्रेस वाढलाय. मानसिक ताण, मोबाईलमध्ये रोज