मॅनेज युअर अँगर (राग व्यवस्थापन)
राग ही खूप प्रखर; पण सामान्य भावना आहे. रागाची तीव्रता व्यक्तीपरत्वे बदलत असते. रागाची तीव्रता खूप वाढली, तर रागाचे रूपांतर संताप आणि हिंसेमध्ये होऊ शकते. ही गोष्ट राग येणाऱ्या आणि राग आलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे रागाचे योग्य वेळी, योग्य रितीने व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट आहे. आजच्या गतिमान जीवनशैलीत ताण, वैफल्य, भिती, असुरक्षिततेची जाणीव, दहशत, अपेक्षाभंग इत्यादी गोष्टींचे प्रमाण वाढलेले आहे. याचा परिणाम 'राग' या सर्वात जास्त नकारात्मक असलेल्या भावनेच्या प्रदर्शनातून व्यक्त होत असतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर 'राग' ही भावना जन्माला येते. विविध वयांतील अनेक माणसे रागावर नियंत्रण कसे करावे, याची विचारणा करत असतात. यावरूनच ही भावना खूप प्रखर असल्याचे लक्षात येते. म्हणूनच योग्य वेळी, योग्य रितीने रागाचे व्यवस्थापन करता येणे ही एक कौशल्याची गोष्ट म्हणून आत्मसात करण्यास काहीच हरकत नाही. त्याची सुरुवात आपण प्रथम रागाची कारणे शोधून करूया. ही कारणे पुढील प्रमाणे विभागू शकतो. * रागास जबाबदार व्यक्तींमधील अंतर्गत घ...