*रफू...* एक मित्र भेटला परवा... खूप जुना... बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं... नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... म्हणाला, _"मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."_ सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो... अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला. विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा _'आलासच ना अखेरीस'_ हा माज ठेऊन. तो मला म्हणाला, _"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली..._ _काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास..._ _ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं..._ _आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता..._ _वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघू...
Comments
Post a Comment