Posts

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

खरंतर परीक्षेची भीती कमी-जास्त प्रमाणात आपल्यातल्या प्रत्येकालाच वाटते. काहीजण या भीतीपोटी जास्त अभ्यास करतात, तर काही जणांची ही भीती इतकी अवास्तव बनते की, परीक्षेच्या आधीपासूनच त्यांना धडधडायला लागते.  पोट बिघडते, झोप उडते, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना हातात प्रश्नपत्रिका आली, की एकदम बधिर व्हायला होते. एकही प्रश्न ओळखीचा वाटत नाही, बघता बघता प्रश्नपत्रिकेवरची अक्षरे ‘गायब’ होऊ लागतात! मुले एकदम ‘ब्लँक’ होतात. यालाच एक्झाम फोबिया (exam phobia) किंवा ‘परीक्षेची अवास्तव भीती’ म्हणतात. परीक्षेच्या भीतीची मेंदूतील केंद्रे :  मेंदूतील चार मुख्य केंद्रांमधून हे कार्य घडते. हायपोथॅलॅमस  : मेंदूच्या मध्यभागातील हे केंद्र भावना समजून त्यांच्या योग्य त्या संवेदना मेंदूला आणि त्याचवेळेस अंतःस्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथींना पोचवते! ॲमिग्डेला  : हेही मेंदूच्या मध्यभागातील केंद्र भावनिक मेंदू व तार्किक मेंदूच्या मधल्या सेतूचे काम करते. पण हे केंद्र जास्त उत्तेजित झाले, तर तार्किक विचारशक्ती बंद पडते. हिप्पोकॅम्पस  : पहिल्या दोन्ही केंद्रांच्या अगदी जवळ असलेले हे केंद्र आपल्य

दुर्देव

  हिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात M.Tech चे उच्च शिक्षण घेत होता, अजून चार महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरु केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखा, समाधानात सुरु होते.  आणि मग अचानक २२ सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोर वरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की “तुमच्या मुलाचा अक्सिडेंट झालाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा” अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्देवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल ? बापाला बेंगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल. अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमधे दाखल केले. वडिल प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोनयेतो की “डॉक्टर म्हणालेत, मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त एक टक्का चान्स असेल जगण्याचा” काय निर्णय घेतला असेल बापाने. दुसऱ्याच क्ष

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम

Image
 

तलाठी भरती - अर्ज भरणेची प्रक्रिया सुरू

 सविस्तर माहितीसाठी येथे Click करा. 👉  Open महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती  २०२३ . ⇒  पदाचे  नाव :   तलाठी . ⇒ एकूण  रिक्त  पदे :   4644  पदे . ⇒  नोकरी  ठिकाण :  महाराष्ट्र. ⇒  शैक्षणिक  पात्रता :  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ⇒  वयोमर्यादा :   खुला प्रवर्ग:  18 ते 38 वर्षे,  मागास प्रवर्ग:  18 ते 43 वर्षे. ⇒ वेतन/ मानधन : रु, 25,500/- ते रु. 81,100/-. ⇒ अर्ज करण्याची पद्धत :  ऑनलाइन. ⇒  अर्ज  शुल्क :  खुला प्रवर्ग :  ₹1000/- ,   राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) :  ₹900/- . ⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख:   26 जून २०२३ . ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख:   17 जुलै २०२३.

नाहीतर पंचविशीत हार्ट अँटॅक हा ट्रेंड होईल!!

 हजारो ह्रदयविकारी रूग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे जीव वाचविणार्या ४१ वर्षांच्या डाॅ. गौरव गांधी यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील जामनगरात हे घडले.  माझ्याकडे २० ते ३० वर्ष वयाचे तरूण ब्लड प्रेशर घेऊन मोठ्या संख्येने येत आहेत. या वयात रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू करायला लागाव्यात असे का घडत आहे? डाॅ. गौरव गांधी यांना व्यसन नव्हते. रात्री छातीत दुखू लागल्यावर त्यांनी, ईसीजी करून घेतला जो नाॅर्मल आला. पित्त समजून घरी परतल्यावर काही तासानंतर ते बेशुद्ध झाले, व्हेंटिलेटरवर ठेवले. पण उपयोग झाला नाही. पोस्ट माॅर्टेम मध्ये ह्रदयात कोणतेही बदल दिसले नाहीत. कारण लक्षणे उद्भवणे आणि मृत्यू यामधील वेळ अत्यंत कमी असेल तर ह्रदयात खुणा सापडत नाहीत. ७ तासाच्या कालावधीत त्या मिळतात.  ह्रदयविकार झटक्यांच्या ३०% केसेसमध्ये ईसीजी नाॅर्मल येतो. अशावेळी हाॅस्पिटलात पुढे २४ तास रहाणे अनिवार्य ठरते. ईसीजी ठराविक अंतराने करणे आणि रक्तातील ट्रोपोनीन व क्रियाटीनीन व अन्य चाचण्या  तपासाव्या लागतात.  तरूण वयात ह्रदयविकार वाढले आहेत कारण स्ट्रेस वाढलाय. मानसिक ताण, मोबाईलमध्ये रोज

भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी भरती

Image
  भारतीय डाक विभागामार्फत महाराष्ट्र पोस्ट सर्कल मध्ये  GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), GDS-डाक सेवक  इ. पदांच्या  2508+  जागांसाठी  महाराष्ट्र टपाल विभाग मेगा भरती 2023  जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार शैक्षणिकदृष्ट्या  10वी उत्तीर्ण  असावा व मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी  शेवट तारीख 16 फेब्रुवारी 2023  च्या आत महाराष्ट्र टपाल विभागाची  अधिकृत वेबसाईट  maharashtrapost.gov.in   ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचावी. विभागाचे नाव : भारतीय टपाल विभाग जाहिरात क्र : 17-21/2023-GDS एकूण जागा : 2508+ जागा पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक- GDS 1) ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 3) डाक सेवक शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र वयाची अट : 18 ते 40 वर्षांपर्यंत जाहिरात पहा 👉 Click Here  Source:  https://www.naukrikendra.

संविधान दिन विशेष- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील भाषण

 भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्याच्या एक दिवस आधीचे संविधान सभेतील शेवटचे भाषण. …माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. …केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्यामते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास