प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते, ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे... आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो? तो फक्त असतो त्याच्या असण्यानंच खूप काही होतं, तशीच ही ऊर्जा केवळ "असण्याची ऊर्जा" आहे. ही एनर्जी घरात असल्यानं घरात स्नेह ओलावा,चैतन्य आहे,घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. तिनं काही करणं हे अतिशय सुंदर एक्स्ट्रा काम आहे, एनर्जीचा उपयोग करुन ती स्वयंपाक करते , घर सजवते पण कधी तिनं ही एनर्जी वापरुन काही केलं नाही तरी तिची किंमत कमी होत नाही, ती एनर्जी घरात आहे आणि ते असणंच एक समाज देणं आहे. घरासाठी तर वरदान आहे... याचा अनुभव प्रत्येकाला आहे , एखाद्या एकट्या रहाणा️ऱ्या पुरुषाचं घर, बॅचलरच्या रुमचं उदाहरण घेऊ, तिथे गेल्यावर कसं वाटतं , ते अनुभवा. तिथे काहीतरी उणिव वाटते ती कसली? तर फेमिनाईन एनर्जीच तिथं नाही.... किंवा घरातली आई/ पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर घरात कसं वाटतं ते पण तपासा. दोन द...
Comments
Post a Comment