आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-19 नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आपण हे समजून घेतले पाहिजे की, गेली काही वर्षे जशी एखादी संसर्गजन्य आजाराची साथ पसरावी, त्याप्रमाणे आत्महत्यांची एक सुप्तसाथ आज आपल्या देशात पसरली आहे. भारतात दरवर्षी दोन लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आत्महत्या केल्याने होतो. त्यामधील निम्म्या म्हणजे साधारण एक लाख आत्महत्या या 15 ते 35 या वयोगटातील म्हणजे तरुणाईच्या असतात. आपण थोडे हळहळतो आणि काही दिवसांनी हे विसरून जातो. पण हा विषय खूप गंभिर आहे. 'युवाल नोवा हरारी' हा आजच्या जगातील एक महत्वाचा भाष्यकार असे म्हणतो की, ‘’युद्ध आणि दहशतवाद ह्यापेक्षा 'आत्महत्या’ हा आजच्या जगासाठी खूप अधिक महत्वाचा प्...
खरंतर परीक्षेची भीती कमी-जास्त प्रमाणात आपल्यातल्या प्रत्येकालाच वाटते. काहीजण या भीतीपोटी जास्त अभ्यास करतात, तर काही जणांची ही भीती इतकी अवास्तव बनते की, परीक्षेच्या आधीपासूनच त्यांना धडधडायला लागते. पोट बिघडते, झोप उडते, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना हातात प्रश्नपत्रिका आली, की एकदम बधिर व्हायला होते. एकही प्रश्न ओळखीचा वाटत नाही, बघता बघता प्रश्नपत्रिकेवरची अक्षरे ‘गायब’ होऊ लागतात! मुले एकदम ‘ब्लँक’ होतात. यालाच एक्झाम फोबिया (exam phobia) किंवा ‘परीक्षेची अवास्तव भीती’ म्हणतात. परीक्षेच्या भीतीची मेंदूतील केंद्रे : मेंदूतील चार मुख्य केंद्रांमधून हे कार्य घडते. हायपोथॅलॅमस : मेंदूच्या मध्यभागातील हे केंद्र भावना समजून त्यांच्या योग्य त्या संवेदना मेंदूला आणि त्याचवेळेस अंतःस्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथींना पोचवते! ॲमिग्डेला : हेही मेंदूच्या मध्यभागातील केंद्र भावनिक मेंदू व तार्किक मेंदूच्या मधल्या सेतूचे काम करते. पण हे केंद्र जास्त उत्तेजित झाले, तर तार्किक विचारशक्ती बंद पडते. हिप्पोकॅम्पस : पहिल्या दोन्ही केंद्रांच्या अगदी जव...
प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते, ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे... आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो? तो फक्त असतो त्याच्या असण्यानंच खूप काही होतं, तशीच ही ऊर्जा केवळ "असण्याची ऊर्जा" आहे. ही एनर्जी घरात असल्यानं घरात स्नेह ओलावा,चैतन्य आहे,घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. तिनं काही करणं हे अतिशय सुंदर एक्स्ट्रा काम आहे, एनर्जीचा उपयोग करुन ती स्वयंपाक करते , घर सजवते पण कधी तिनं ही एनर्जी वापरुन काही केलं नाही तरी तिची किंमत कमी होत नाही, ती एनर्जी घरात आहे आणि ते असणंच एक समाज देणं आहे. घरासाठी तर वरदान आहे... याचा अनुभव प्रत्येकाला आहे , एखाद्या एकट्या रहाणा️ऱ्या पुरुषाचं घर, बॅचलरच्या रुमचं उदाहरण घेऊ, तिथे गेल्यावर कसं वाटतं , ते अनुभवा. तिथे काहीतरी उणिव वाटते ती कसली? तर फेमिनाईन एनर्जीच तिथं नाही.... किंवा घरातली आई/ पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर घरात कसं वाटतं ते पण तपासा. दोन द...
Comments
Post a Comment