Posts

Showing posts from August, 2021

वाचावीत अशी 100 पुस्तके

 🌺 वाचावीत अशा 100 पुस्तकांची यादी 🌺 📚✍🏻📕📗🗞📖🗃 ०१) ययाती = वि. स. खांडेकर  ०२) वळीव = शंकर पाटील ०३) एक होता कार्वर = वीणा गवाणकर ०४) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती ०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात ०६) शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे ०७) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर ०८) तीन मुले = साने गुरुजी ०९) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे. १०) आय डेअर = किरण बेदी ११) तिमिरातुन तेजाकड़े - डॉ. नरेंद्र दाभोलकर १२) मृत्युंजय = शिवाजी सावंत १३) फकिरा = अण्णाभाऊ साठे १४) जागर -  १५) अल्बर्ट एलिस - अंजली जोशी १६) प्रश्न मनाचे - डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोलकर १७) समता संगर - डॉ. नरेंद्र दाभोलकर १८) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू १९) ठरलं डोळस व्हायचं- डॉ. नरेंद्र दाभोलकर २०) मी जेव्हा जात चोरली - बाबुराव बागुल २१) गोपाळ गणेश आगरकर = ग. प्र. प्रधान २२) कुमारांचे कर्मवीर - डॉ. द. ता. भोसले २३) खरे खुरे आयडॉल - यूनिक फीचर्स २४) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी २५) प्रकाशवाटा - प्रकाश आमटे २६) अग्निपंख - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम २७) लज्जा - तसलीमा नसरीन २८) दैनंदिन पर्यावरण - दिलीप ...

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका भाग २

अंक वाचण्यासाठी खालील  नावावर क्लीक करा.   अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका भाग 2 Click Here👆  

पुस्तके का व कशी वाचावीत ?

१) तुम्हाला वाचनाची आवड आहे, हे तुम्हाला मिळालेले एक वरदान आहे असे समजा. कुठलेही पुस्तक वाचण्यास घेताना त्याला पुस्तक न समजता एक कोडं समजा, ते कोडं आपण एकटे सोडवणार आहात असे गृहीत धरून वाचनास घ्या.  २) सुरुवातीला वाचन केवळ आनंद मिळवण्यासाठी करा.  ३) येथे कोणाशीही तुलना करत बसू नका. मी एवढी पुस्तके वाचली. माझ्याकडे एवढी पुस्तके आहेत म्हणणारे केवळ लोकांना आपण कोणीतरी विशेष आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी मंडळी असतात.  ४) केवळ हजारो पुस्तके वाचणे हा आपला उद्देश नसावा.  ५) मानवी आयुष्य इतके मर्यादित आहे की तुम्ही २४ तास पुस्तके वाचत बसलात तरी तुमच्या बेभरवश्याच्या आयुष्यात काही हजारच पुस्तके वाचून होतील.  ६) तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला भाराभर वाचन करावयाचे नसून प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरणारी ज्ञान, माहिती, उपदेश, आनंद, अध्यात्म, काव्य, रसास्वाद आणि मार्गदर्शन देणारी निवडक पुस्तके परिपूर्ण पद्धतीने वाचून स्वतःचे जीवन घडवायचे आहे हे स्वतःशी स्पष्ट करा.  ७) पुस्तक हे साधन आहे, साध्य नव्हे. माणूस केवळ एका-मागोमाग पुस्तके आणत जातो व आपला ग्रंथसंग्रह वाढव...

आनंदी रहाण्याची जादू

हा एक प्रयोग समजा. कोणतंही एक लहानसं काम घ्या. *उदा. एका शर्टाला इस्त्री करणे, कपाटात पुस्तकं नीट लावणे, टिव्ही स्वच्छ पुसणे, सुरेख भाजी चिरणे... अट एकच ते काम तुम्ही मन लावून आपल्याला जितकं चांगलं येतं तितकं चांगल करायचं आहे. बिनचूक ... दिसायला सुंदर...!* *आता ते काम झाल्यावर आतून जे वाटतं ते अनुभवा, तो असतो आनंद. कधीकधी पहा आपण स्वतःशीच हसतो सुद्धा. आपण थोडं मागे जातो, कामाकडे पहातो आणि आपण खूश होतो. घर आवरल्यावर स्त्रिया घरभर नजर फिरवून तृप्त होतात किंवा आपली कार धुऊन चकचकीत झाल्यावर पुरुष पहात बसतात..! लहान मुलं तर काही तयार केल्यावर नाचतातच ...!* *हे काय आहे ? हा आनंद आतून येणारा ...आतल्या चैतन्याला काम आवडल्याचा...!* *हा आनंद बेस्ट मोटिवेशन आहे. बाहेर काही शोधायची गरज नाही. मला हा सापडलाय. सुरुवातीला हा आनंद खूप सुक्ष्म असतो; पकडावा लागतो. एकदा दिसू लागला की वाढत जातो आणि आपण अक्षरशः त्यात  भिजून जातो. करायचं काय ? तर वरील पध्दतीने काम केल्यावर क्षणभर थांबायचं आणि आत कसं वाटतंय ते पहायचं, अनुभवायचं; मग दुस-या कामाकडे जायचं.* *सकाळी उठल्या उठल्या आपण जे पांघरुण घेतलं होतं त्या...

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका अंक १

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचा पहिला अंक वाचण्यासाठी खाली क्लिक करा. Click Here👉