दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये : भाग ६

वाचकहो, 

दैनंदिन जीवनात आपण अनेक वाक्यांच्या आधारे संप्रेषण करत असतो. हीच वाक्ये आपणास इंग्रजी भाषेतून देखील सहजपणे बोलता यावीत यासाठी या ब्लॉगवर आम्ही  काही मराठी वाक्ये व त्यांचे इंग्रजी अनुवाद याचे काही भाग  सादर करीत आहोत. आज भाग सहावा आहे.  याचा उपयोग आपणास इंग्रजी संभाषणासाठी नक्की होईल अशी आशा आहे. माहिती आवडल्यास खाली आपल्या प्रतिक्रिया या पोस्ट खाली नक्की कळवा. 


 १. मला उलट बोलू नकोस. 

*   Don't talk back to me. 


२. मी कोणाचेही ऐकत नाही. 

*   I don't listen to anyone. 


३. व्यवस्थित बोल. 

*   Talk with manners. 


४. मला त्रास देणे  बंद करा. 

*   Stop annoying me. 


५. तु खूप स्वार्थी आहेस. 

*  You are so selfish. 


६. तुमच्या संकटांना तोंड द्या. 

*   Face your problems. 


७. स्वतः सामना करा. 

*   Face your self. 


८. माझ्यावर उपकार करू नका. 

*   Don't favour me. 


९. मला बोलू नका. 

*   Don't talk to me. 


१०. तुमचा सल्ला स्वतःकडेच ठेवा. 

*    Keep your advice to yourself. 


११. माझ्यावर संशय घेऊ नका. 

*    Don't doubt me. 


१२. असे काहीही नाही आहे. 

*    There is nothing like that. 


१३. माझ्याशी वाद घालू नका. 

*    Don't argue with me. 


१४. मला चिडवू नका. 

*    Don't tease me. 


१५. माझा वेळ वाया घालवू नका. 

*    Don't waste my time. 


१६. मी माझी चूक कबूल करतो. 

*    I admit my mistake. 


१७. काहीतरी मोठं करण्याचा विचार करा. 

*   Think of doing something big. 


१८. हे चुकून झाले. 

*    It happened by mistake. 


१९. तुम्ही काय विचार करीत आहात ?

*    What are you thinking ?


२०. तुम्हाला काही बोलायचे आहे का ? 

*    Do you want to say something ?


क्रमशः.....

(उर्वरित वाक्यांसाठी पुढील भाग नक्की वाचा) 

Comments

Popular posts from this blog

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

परीक्षेची अवास्तव भीती (एक्झाम फोबिया)

स्त्रियांची एनर्जी