अर्थशास्त्राविषयी थोडेसे
अर्थकारणाचा सूक्ष्म अभ्यास
समाज आणि देशाच्या प्रत्येक क्षेत्रात अर्थशास्त्राची गरज असते. मर्यादित साधनांचा वापर करून अमर्यादित गरजांची पूर्तता करणे, या अभ्यासाला अर्थशास्त्र म्हणतात. अर्थशास्त्राचे नियम आपल्या आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहारांवर चालतात. अर्थतज्ज्ञ बनून तुम्ही यावर करडी नजर ठेवू शकता. छोट्या कुटीर उद्योगापासून तर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांना तुम्ही समजून घेऊ शकता.
विद्यार्थ्यांमध्ये कोणती गुणवैशिष्ट्ये असावीत?
या विषयाचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता विद्याथ्र्यांमध्ये असावी. यासोबतच अंकगणिताची विस्तृत माहिती असावी. आर्थिक विषमता, सामान्य अथवा गंभीर आर्थिक परिस्थिती समजून घेण्याची क्षमता असावी लागते. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अर्थतज्ज्ञांचे निरीक्षण कौशल्य विकसित असावे.
अभ्यासाचे विविध मार्ग :
अर्थशास्त्र हा १२वीपर्यंत विषय म्हणून शिकवला जातो. यात करिअर करण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी अर्थशास्त्रात बी.ए. आणि त्यानंतर एम.ए. करू शकतात. संबंधित विषयात पदवी घेताना तुम्ही इतर कोर्सेसही करू शकता. उदाहरणार्थ : बी.ए. (बिजनेस इकॉनॉमिक्स), बी.ए. (डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स). देशातील अनेक यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये हे कोर्सेस आहेत. दिल्ली विद्यापीठात हे कोर्सेस करण्यासाठी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असावे लागते.
स्पेशलायजेशनची वाढती मागणी :
ग्रॅज्युएशनमध्ये अधिक गुण असलेल्या विद्याथ्र्यांना पदव्युत्तर पातळीवर अर्थशास्त्राच्या विविध शाखांमध्ये स्पेशलायजेशन करण्याचा पर्याय असतो. यामध्ये मुख्यतः अॅनालिटिकल अॅण्ड अप्लाइड इकॉनॉमिक्स, बिजनेस इकॉनॉमिक्स, कॉर्पोरेशन अॅण्ड अप्लाइड इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रिक्स, इंडियन इकॉनॉमिक्स या उपविषयांचा समावेश आहे. याशिवाय इंडस्ट्रीअल इकॉनॉमिक्स, बिजनेस इकॉनॉमिक्स, अॅग्रीकल्चर इकॉनॉमिक्स, एन्व्हायर्नमेंटल इकॉनॉमिक्स, बँकिंग इकॉनॉमिक्स आणि रुरल इकॉनॉमिक्स यांचाही उल्लेख करता येईल. त्याचप्रकारे एमबीए हासुद्धा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही अर्थशास्त्रात पीएच.डी.सुद्धा करू शकता.
इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिस:
देशात इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सव्र्हिसप्रमाणे इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिस हा अर्थक्षेत्रातील प्रशासकीय सेवेचा राजमार्ग आहे. अखिल भारतीय स्तरावर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा आयोजित करते. अर्थशास्त्र/स्टॅटिस्टिक्स विषयात पी.जी. असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. लेखी परीक्षा गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना साक्षात्कारासाठी बोलावले जाते. या परीक्षेसाठी उमेदवाराचा वयोगट २१ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आला आहे. लेखी परीक्षेत जनरल इंग्लिश, जनरल नॉलेज आणि अर्थशास्त्र या विषयावर आधारित लेखी पेपर घेतला जातो. ही केंद्र शासनाची ग्रुप ‘ए’ची सर्व्हिस असते. यशस्वी विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूूट ऑफ इकॉनॉमिक्स ग्रोथ, दिल्ली येथे प्रशिक्षण दिले जाते. यानंतर उमेदवाराची पहिली नियुक्ती सहायक निदेशक पदावर केली जाते. कार्यानुभव वाढल्यानंतर प्रिंसिपल इकॉनॉमिक्स अॅडव्हायजर पदावर काम करण्याची संधी मिळते.
विदेशातील नोकरीच्या संधी :
अर्थशास्त्र तज्ज्ञांना विदेशी संस्थांमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये सेवेची संधी मिळू शकते. यांची नियुक्ती अर्थशास्त्रज्ञ, विश्लेषक, सल्लागार आदी पदांवर केली जाते. विदेशातील शासकीय संस्थांमध्येही भारतीय अर्थतज्ज्ञांची मागणी वाढत आहे. तसेच त्यांना रिसर्च स्कॉलर/प्राध्यापक यासारख्या पदांवर उच्च वेतनाची नोकरी करण्याची संधी मिळू शकते.
विशिष्ट कोर्सेसचा लाभ घ्यावा :
देशातील काही निवडक विद्यापीठांमध्ये ग्रॅज्युएशनच्या आधारावर तीन वर्षांचा ‘बॅचलर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स’ कोर्स उपलब्ध आहे. निवड परीक्षेच्या आधारे या कोर्सकरिता प्रवेश दिला जातो. प्रवेश परीक्षेत व्हर्बल अॅबिलिटी, क्वाँटिटेटिव्ह अॅबिलिटी, लॉजिकल रिजqनग, जनरल अवेअरनेसशी संबंधित ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सध्या दिल्ली विद्यापीठांतर्गत येणाèया १० कॉलेजेसमध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहेत. येथे ४८० जागांसाठी प्रवेश दिला जातो.
रोजगाराच्या संधी :
खासगी क्षेत्रातील सर्वच औद्योगिक संस्था, बँकिंग सेक्टर, फायनान्शियल इन्स्टिट्यूट, कॉमर्स सव्र्हिसेस, टॅक्सेशन, इंटरनॅशनल ट्रेड, अॅक्चुरियल सायन्स इत्यादींमध्ये या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मागणी सातत्याने वाढतीवर आहे. दरवर्षी शासकीय क्षेत्रामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, निती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अॅण्ड पॉलिसी, नॅशनल सॅम्पल सर्व्हे त्याचप्रमाणे राज्य शासनाशी संबंधित अनेक विभागांत मोठ्या संख्येने अर्थतज्ज्ञांची गरज असते. अर्थशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम, एम.एड., बी.एड. आणि नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही या क्षेत्रात शिक्षक म्हणूनही नोकरी करू शकता.
आव्हाने :
ग्रॅज्युएशननंतर या क्षेत्रात रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यापेक्षाही चांगल्या संधी हव्या असतील तर उच्च अध्ययनाची गरज असते. मोठ्या संख्येने उलाढाल असलेल्या उद्योगांमध्ये स्टॅटिस्टिक्स, कॅल्क्युलस आणि उच्च श्रेणीच्या गणिताचा वापर होतो. यामुळे विद्याथ्र्यांची गणितावर मजबूत पकड असावी.
देशातील प्रमुख शिक्षण संस्था :
♦ दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली
♦ जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली
♦ युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे, मुंबई
♦ बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाराणसी
♦ प्रेसिडेंसी कॉलेज, कोलकाता
याशिवाय महाराष्ट्रातील सर्वंच विद्यापीठे तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये अर्थशास्त्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment