समुपदेशन

 "समुपदेशन करताना अनेक अनुभव येतात..बरच काही शिकवून जातात.."


कित्येकदा लोकं म्हणतात, "तुझी परीस्थिती मी समजू शकतो..!

"मित्रं, नातेवाईक कदाचित सहानुभूती म्हणून असे म्हणू शकतात. त्यावेळी ते योग्यही असेल.

पण खरच आपण एखाद्याची स्थिती समजू वा अनुभवू शकतो? बहुतेक नाही..

त्या माणसाच्या मनांत बरंच काही साठलेले असते, त्याला कोणालातरी बरंच काही सांगायचे असते मग अश्यावेळी त्या व्यक्तीला बोलते करणे गरजेचे असते." परीस्थिती समजून घेण्यासाठी माणसाचे मन समजून घेणे" फार महत्वाचे असते, असे मला वाटते.. 


म्हणूनच, समुपदेशक समोरच्या व्यक्तीच्या मनात साठलेले "मळभ" दूर करायचा प्रयत्न करत असतो, त्याच्या भावनांचा आदर करून त्याचे म्हणणे व्यवस्थित ऐकून मगच त्याला समुपदेशक सोयिस्कर पर्याय किंवा विचारांना नवी दिशा देऊ शकतो.. परीस्थिती बदलण्याची जादू समुपदेशकाकडे नसेलही पण परीस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य तो नक्कीच देऊ शकतो. 


अभिजित आपटे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

तरुणाई भरकटते आहे…

रफू