Posts

'नको विशेषण आता निर्भया'

रोज एखाद दुसरी निर्भया दिसते दैनिकात,येते ऐकिवात तिची 'ती' अवस्था झालेली...... निर्भया कधी कोवळी बाला,कुमारिका,कधी तरुणी तर कधी आईच्या वयाचीही... कधी गरीब,तर कधी चांगल्या घरची, निर्भया, कधी अपंग असते... तर कधी मतिमंदही, तर कधी विधवाही ।। 'ती सुंदर असतेच अस नाही.... पण......  ती " 'स्त्री' असते' त्यांना फक्त कोणतीही स्त्री हवी असते .... आपल्या सामूहिक बलात्कारातून, विकृत ,वासनांध मानसिकतेतून, 'ती' चा बळी घेण्यासाठी ।। सखी,तू आदर्श नारी या देशाची  तू स्वतःच एक शक्तीपीठ  आज माझ्याकडून भेट साऱ्या सख्याना.. .. माझ्या विचारांच्या सज्ज तोफा  ही भेट स्वीकारुन सख्यानो, आपण साऱ्याजणी.... प्रतिकार करु...धिक्कार करु... वासनेच्या भोक्त्यांचे, समाजकंटकी, कलंकी वृत्तीचे उगम, आणि निर्भयांच्या शृंखला ।। रडत बसू बकोस, बळी पडू नकोस, जागरूक हो, आता निडरपणे जगायचं.... पण, निर्भया हे नकोस विशेषण न लावता, 'तू चंडीका हो, नवदुर्गा हो, जिजाऊ हो, झाशीची राणी हो, नराधम असुरांचा.... कर्दनकाळ हो, तू सज्ज हो' ।। रचना:- सौ अश्विनी कुलकर्णी सांगली जागतिक महिला दिनाच्या हार्...

तंत्रसाक्षरता आणि महिला

          स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढत असले तरी, डिजिटल जगातला वावर वाढला असला, तरी त्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे. एवढेच नव्हे, तर प्रौढ साक्षर स्त्रिया अजूनही डिजिटल विशिष्ट छोट्या व जुजवी वर्तुळात फिरत आहेत. व्हॉटसअॅप, ई - मेल, मेसेज, नेटवरून माहिती शोधणे वगैरेबाबतही माहिती घेण्यात त्या मागे राहतात. त्याचे कारण उत्सुकता व कल नसणे. दुसरे म्हणजे त्या वस्तू वापराबद्दलची भीती. तिसरे म्हणजे आत्मविश्वास नसणे. डिजिटल अवकाश न विस्तारलेल्या स्त्रियांची संख्या मोठीच आहे. शिक्षण हा व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे आणि त्या विकासात डिजिटल विश्व आणि तंत्र वापर ही अपरिहार्यता आहे ; मात्र जनरल एज्युकेशनमधून अगदी पदवी - पदव्युत्तरपर्यंत सामान्य शिक्षणात डिजिटल प्रशिक्षण व ज्ञान शिकविले जात नाहीच. खरे तर, तसे कौशल्य शिकण्याची आवड व माहिती ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा हवी, ज्याची कमतरता स्त्रियांमध्ये आढळते. नकारात्मक भावना असते त्याबद्दल. कोरोना काळात मुलांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे लिंक पाहणे व पाठवणे, मेसेज करणे, डेटा संपत आल्याची माहिती घेणे, ट्विट पाहणे संवाद साधणे...

स्लीप अ‍ॅप्निया (निद्रा श्वसनबाधा विकार) काय आहे ?

Image
निद्रा श्वसनबाधा विकार काय आहे ?   बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांचे स्लीप  अ‍ॅप्निया  या विकाराने निधन झाले आहे. निद्रा श्वसनबाधा विकार 'स्लीप  अ‍ॅप्निया ' या आजारामध्ये झोपेत असताना अचानक श्वास घेणे थांबते आणि नंतर अचानक सुरू होते. या काळात शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. श्वास बंद झाल्यावर डोळे उघडतात आणि जागे होताच व्यक्ती वेगाने श्वास घेऊ लागते. दीर्घकाळ उपचार न केल्यास निद्रा श्वसनबाधा विकार 'स्लीप  अ‍ॅप्निया ' खूप धोकादायक ठरू शकतो.  रात्री वारंवार झोपमोड होतेय?  बऱ्याच वेळेला आपल्याला हा विशिष्ट विकार कशामुळे झाला हे समजत नाही. पण संशोधनाअंती कळते की, तो आजार आपल्याला निद्रानाशामुळे झाला. रात्रीची झोप अपुरी राहिल्यामुळे दिवस मरगळलेल्या अवस्थेत जाणे हा त्रास अनेकांना होत असतो. रात्रीची झोप पूर्ण होत नाही हे लक्षात येत असले तरी ती पूर्ण का होत नाही, वारंवार झोपेदरम्यान अडथळा येण्याचे कारण काय हे कळत नाही. ते शोधण्यासाठी 'स्लीप  अ‍ॅप्निया ' तपासणी उपयुक्त ठरू शकते. 'स्लीप  अ‍ॅप्निया ' हा केवळ एकच एक विकार नाही...

आधी मनातील कॅन्सर बरा करूया...

        मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध आहे. आपले विचार, भावभावना यांचा शरीरावर परिणाम होत असतो. आपल्या मनातील विचाराद्वारे आपल्या शरीरातील पेशी कार्य करीत असतात. त्यामुळे आपल्या भावनांचे, विचारांचे प्रतिबिंब आपले शरीर, व्यक्तिमत्त्वात असते. अमेरिकेतील प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बर्नी सिगेल यांनी "जो जगावर प्रेम करतो मात्र स्वतः वर अन्याय करतो, अशा व्यक्तीला कॅन्सर होतो' असे म्हटले आहे. याचा अर्थ काय, तर कॅन्सर झालेली व्यक्ती ही स्वतःला नेहमी दुसऱ्याच्या चष्म्यातून बघत असते. स्वतःला काय हवे किंवा स्वतःला काय आवडते, याच्यापेक्षा ती व्यक्ती इतरांचा जास्त विचार करत असते. सतत स्वतःला कमी लेखणे, स्वतःची इतरांशी तुलना करणे, एखादी गोष्ट साध्य झाली नाही, तर स्वतःला शिक्षा करणे, स्वतःची टीका, अवहेलना करणे, असे प्रकार आपण करत असतो, इतरांच्या मतावर आपण स्वत:ला चांगले किंवा वाईट आहोत, हे ठरवत असतो. वास्तविक आपण इतरांवर किंवा कुटुंबावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं. इतरांची काळजी करताना किंवा इतरांची काळजी घेताना आपणही स्वतःच्या आयुष्याकडे बघावे. आपली काळजी घ्यावी, हे विसरून जा...

खरे संस्कार

       मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, "बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आज पर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल."  त्याची मुलगी सारा म्हणाली, "बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही कांहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवऊं द्या."  थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला.  तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यास...

स्त्रियांची एनर्जी

प्रत्येक शरीरात स्त्री ऊर्जा म्हणजेच Feminine energy असते, अन् स्त्री शरीरात ती जास्त प्रमाणात असते, ही एनर्जी पालन पोषण करणारी, प्रेम आणि क्षमेनं सर्वांना जोपासणारी एनर्जी आहे. ही ऊर्जा असणं हीच एक मोठी गोष्ट आहे... आकाशात सूर्य असतो तो दिवसभर काय करतो?  तो फक्त असतो त्याच्या असण्यानंच खूप काही होतं, तशीच ही ऊर्जा केवळ "असण्याची ऊर्जा" आहे. ही एनर्जी घरात असल्यानं घरात स्नेह ओलावा,चैतन्य आहे,घरात उत्साह आहे, सौंदर्य आहे. तिनं काही करणं हे अतिशय सुंदर एक्स्ट्रा काम आहे, एनर्जीचा उपयोग करुन ती स्वयंपाक करते , घर सजवते पण कधी तिनं ही एनर्जी वापरुन काही केलं नाही तरी तिची किंमत कमी होत नाही, ती एनर्जी घरात आहे आणि ते असणंच एक समाज देणं आहे. घरासाठी तर वरदान आहे... याचा अनुभव प्रत्येकाला आहे , एखाद्या एकट्या रहाणा️ऱ्या  पुरुषाचं घर, बॅचलरच्या रुमचं उदाहरण घेऊ, तिथे गेल्यावर कसं वाटतं , ते अनुभवा. तिथे काहीतरी उणिव वाटते ती कसली? तर  फेमिनाईन एनर्जीच तिथं नाही.... किंवा  घरातली आई/ पत्नी बाहेरगावी गेली आणि घरात इतर कोणतीही स्त्री नसेल तर घरात कसं वाटतं ते पण तपासा. दोन द...

शिक्षणाचे बदलते रूप

Image