Posts

तापट स्वभावावर नियंत्रण हवेच..

एक गाढव झाडाला बांधलेले होते. सैतान आला आणि त्याने ते गाढव सोडून दिले. ते गाढव शेतात घुसले आणि उभ्या पिकाची नासधूस करू लागले. शेतकऱ्याच्या बायकोने हे पाहिले आणि बंदुकीच्या गोळीने गाढव ठार केले. गाढवाच्या मालकाला हे सहन झाले नाही,त्याने शेतकऱ्याच्या बायकोला ठार केले. इकडे शेतकरी घरी आला.बायकोला रक्ताच्या थारोळ्यात पाहून संतापला आणि त्याने गाढवाच्या मालकाला ठार मारले. गाढवाच्या मालकाच्या बायकोने आपल्या मुलांना आदेश दिला की,शेतकऱ्याचे घर पेटवून द्या. त्या संध्याकाळी तिच्या दोन मुलांनी शेतकऱ्याचे घर पेटवून दिले आणि शेतकरी त्यात जळून खाक झाला असेल,या आनंदात घरी आले. परंतु त्या आगीतून शेतकरी वाचला,तो परत आला आणि त्याने गाढवाच्या मालकाची बायको आणि दोन मुले ठार केली. पाश्चातापाने शेतकऱ्याने सैतानाला विचारले की हे सगळे असे का घडले ? त्यावर सैतान म्हणाला की, *"मी काहीच केले नाही,मी तर फक्त गाढवाला मुक्त केले होते.तुम्ही त्यावर क्रिया-प्रतिक्रिया करत बसला आणि आपल्यातल्या सैतानाला मुक्त केले."* *त्यामुळे इथून पुढे उत्तर देताना,प्रतिक्रिया व्यक्त करताना,बातमी देताना,धिक्कार करताना,सुड व ब...

स्वभावाला औषध नसत?

 स्वभावाला औषध नसतं’  असं म्हणतात – म्हणजे एखादी व्यक्ती तिच्या स्वभावानुसार जशी वागत असेल, त्याला काही पर्याय नाही. त्या व्यक्तीचं वागणं बदलू शकत नाही. मला हे पूर्णतः पटत नाही.. स्वभाव स्वभाव म्हणजे नक्की काय? लोभी, लोभस, आळशी, कंजूस, परोपकारी, रागीट, बेफिकीर, मत्सरी, गप्पिष्ट, भित्रा, धीट, आनंदी, हट्टी, whimsical इत्यादी आणि अजून बरेच.. यातली एखादी गोष्ट तरी प्रत्येकात जास्त प्रमाणात असतेच, आणि तिच्यावरून त्या व्यक्तीचा स्वभाव ठरतो (किंबहुना लोक ठरवतात)!! माणसाचा स्वभाव बदलू शकत नाही का? एखादी व्यक्ती रागीट भासली तर ती जन्मभर रागीटच असते का? एखादी व्यक्ती sarcastic असेल तर ती आयुष्यभर उपहासात्मकच बोलते का? मी काही मानसशात्रज्ञ वगैरे नाही, पण सहज विचार केला तर वाटतं की हे तितकं खरं नसावं. कुणाच्याही स्वभावात साधारणतः दोन गोष्टी असतात – १. काही पैलू जे ती व्यक्ती जन्मत:च घेऊन आलेली असते. आणि २. काही गोष्टी आजूबाजूची लोकं आणि परिस्थिती तिला बहाल करतात, किंवा अंगावर थोपवतात. पहिल्या प्रकारातून जास्तीत जास्त २०% भाग येत असेल एखाद्याच्या स्वभावात. पण बहुतांश स्वभाव हा दुसऱ्या प्रक...

अर्थशास्त्राविषयी थोडेसे

  अर्थकारणाचा सूक्ष्म अभ्यास समाज आणि देशाच्या प्रत्येक क्षेत्रात अर्थशास्त्राची गरज असते. मर्यादित साधनांचा वापर करून अमर्यादित गरजांची पूर्तता करणे, या अभ्यासाला अर्थशास्त्र म्हणतात. अर्थशास्त्राचे नियम आपल्या आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहारांवर चालतात. अर्थतज्ज्ञ बनून तुम्ही यावर करडी नजर ठेवू शकता. छोट्या कुटीर उद्योगापासून तर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांना तुम्ही समजून घेऊ शकता. विद्यार्थ्यांमध्ये कोणती गुणवैशिष्ट्ये असावीत? या विषयाचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता विद्याथ्र्यांमध्ये असावी. यासोबतच अंकगणिताची विस्तृत माहिती असावी. आर्थिक विषमता, सामान्य अथवा गंभीर आर्थिक परिस्थिती समजून घेण्याची क्षमता असावी लागते. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अर्थतज्ज्ञांचे निरीक्षण कौशल्य विकसित असावे. अभ्यासाचे विविध मार्ग : अर्थशास्त्र हा १२वीपर्यंत विषय म्हणून शिकवला जातो. यात करिअर करण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी अर्थशास्त्रात बी.ए. आणि त्यानंतर एम.ए. करू शकतात. संबंधित विषयात पदवी घेताना तुम्ही इतर कोर्सेसही करू शकता. उदाहरणार्थ : बी.ए. (बिजनेस ...

जिभेवरील शब्द

एक बांगड्या विकणारे काका होते. गावोगावी फिरून बांगड्या विकायचे.  त्यांच्याकडं एक मोठी बांबूची टोपली होती. टोपली डोक्यावर घेऊन इकडून तिकडे जायचे. त्यामध्ये ते बांगड्या अशा पद्धतीने रचायचे की वरचे कापड काढल्यावर सर्व प्रकारच्या बांगड्या ग्राहकांना दिसायच्या.  हळूहळू बांगड्यांची विविधता वाढू लागली आणि टोपलीचा आकार वाढू लागला.  आता सगळी विविधता त्या टोपलीत मावेना म्हणून त्यांनी एक गाढवी विकत घेतली. तिच्या पाठीवर ठेवता येईल अशी रचना बनवली.  बांगडीवाले काका आणि राणी नाव ठेवलेली त्यांची गाढवी गावोगावी फिरताना दिसू लागले.  यामध्ये असलेला सर्वात गमतीचा भाग म्हणजे काकांचे राणीशी चाललेले संभाषण.  पुढे दगड दिसला तर ते म्हणायचे, "राणी बेटी, पुढे दगड आहे, थोडे बाजूने चाल." कधी ती खूपच हळू चालू लागली तर म्हणायचे, "अगं राणी, थोडे लवकर पाय उचल, गावोगावी माझ्या मुली माझी वाट पाहत आहेत." राणी कधी वेगाने जाऊ लागली, जे फारच क्वचित व्हायचे तर म्हणायचे, "काय बेटी, आज काय हरीण झालीस का? जरा जपून पाय टाक. बांगड्या फुटतील ना!"  ते इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय गाढवीला क...

स्टाफ सिलेक्शन परिक्षेविषयी संपूर्ण माहिती

1. कम्बाइंन ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा  2. हायर सेकंड्री (10+2) लेव्हल परीक्षा 1. कम्बाइंन ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा : कम्बाइंन ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा केंद्र सरकारशी संबंधित विविध विभागामध्ये तसेच मंत्रालयामध्ये वर्ग 2 व वर्ग 3 च्या अधिकार्‍यांची निवड या परीक्षेतून केली जाते. भरली जाणारी पदे : ग्रुप-अ असिस्टंट इन्स्पेक्टर (पोस्ट) इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज प्रीव्हेंटिव्ह ऑफिसर / एक्झामिनर सब इन्स्पेक्टर (सीबीआय) इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर डिव्हीजनल अकाउंटंट स्टॅटिस्टिकल इनव्हेस्टिगेटर ग्रुप – ब ऑडिटर्स ज्युनिअर अकाउंटंट / अकाउंटंट (कॅग मध्ये) अप्पर डिव्हिजनल क्लर्क टॅक्स असिस्टंट कम्पायलर (संकलक) पात्रता : उमेदवार कुठल्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे मात्र काही पदांसाठी ठराविक शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते. कम्पायलर (संकलक) : अर्थशास्त्र, संख्याशास्त्र किंवा गणितातले पदवीधर असणे आवश्यक आहे. स्टॅटिस्टिकल इनव्हेस्टिगेटर : संख्याशास्त्रातील पदवीधर किंवा कॉमर्स, गणित, अर्थशास्त्र शाखांमधले पदवीधर (पदवीला किमान एखाद्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये संख्याशा...

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय?

          अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC . तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असत. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात  दिली जाते.  या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या  सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात!                आता प्रत्येक पदाकरिता या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप वेगवेगळे असते जसे की गृह खात्यात जी  पोलीस भरती केली जाते त्या पदासाठी उमेदवार  शारीरिक स्वरूपात देखील परिपूर्ण असायला हवा मग अशा पदांसाठी लेखी परीक्षे सोबतच शारीरिक गुणवत्त...

मनाचिये गुंती

    जीवनाचा अनादि, अनंत प्रवाह, त्यातून तुमच्या आमच्या ओंजळीत येणारे काही क्षण. कधी रेशीमलडींसारख्या उलगडणार्‍या तर कधी धारदार पात्यासारख्या लखलखणार्‍या जाणिवा. अवतीभवतीच्या जगातले आपणच लोक आपापल्या परीनं एकमेकांची सुखदु:खं वाटून घेत असतो, साथसंगत करत असतो, नातीगोती जपायचा मनापासून प्रयत्न करत असतो. कधी रीत तसं करायला भाग पाडते म्हणून तर कधी अंतरंगात दाटणारी प्रीत, म्हणून. अख्ख्या जगाबरोबरीने जुळवून घेताना, कधी वाट्याला आलेली, तर कधी असोशीने आपलीशी केलेली नाती जपत असताना, कधी ह्याचं मन, तर कधी तिचं मन जपताना आणि अशाच तर्‍हेने आणखी कोणाकोणाची मनं जपत जगू पाहताना, एखाद्या लख्ख क्षणी स्वतःलाच उलगडू पाहतं स्वतःचं मन. नजरेला नजर भिडवत, आपल्याला त्याच्या अस्तित्त्वाची ओळख पटवू पाहतं. मनातले सारे उत्कट भाव पुरासारखे थांबतात मनाच्या उंबरठ्याशी येऊन आपल्याच मनाशी नातं जुळतानाचा हा प्रवास इतकाही काही सोपा नसतो. मृदूमुलायम पायघड्या घातलेल्या नसतात. सारं काही स्पष्ट दिसासमजायला आणि आहे तसं उमजायला, कित्येक दरवाजे अजून धडका मारून उघडायचे असतात. पलिकडे जे काही असेल, त्याच्याशी डोळा भिडवायची...