Posts

रफू

  *रफू...* एक मित्र भेटला परवा...  खूप जुना...  बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं...  नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर...  म्हणाला, _"मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं ठरवलंय."_ सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो... अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही पुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला.  विचारलं मी त्याला अचानक ऊपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा _'आलासच ना अखेरीस'_ हा माज ठेऊन.  तो मला म्हणाला,  _"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली..._  _काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास..._  _ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं..._  _आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता..._  _वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघू...

मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी

 मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी *नकारात्मकता' कशी येते ते पहा.* मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे,  मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी! काही मानसशास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक प्रयोग केला, एका नव्याकोऱ्या, अलिशान, चकचकीत आणि देखण्या हॉटेलचा शुभारंभ होता, आतुन बाहेरुन, ते हॉटेल अतिशय भव्यदिव्य आणि सुंदर होते. त्या हॉटेलच्या डिझाईनवर, बांधकामावर, डिझाईनवर, आणि तिथल्या फर्निचरवर पाण्यासारखा पैसा ओतण्यात आला होता. हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाला हजारो लोकांना आमंत्रण दिले गेले होते. पण एक प्रयोग म्हणुन ह्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचा वापर करण्याचे मानसशात्रज्ञांनी ठरवले. त्यांच्या सांगण्यावरुन हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये पोहोचल्याबरोबर दिसणारी, अगदी समोरच्या भिंतीवर लावलेल्या सुंदर टाईल्सच्या डिझाईनमधली एक टाईल, मुद्दामहुन बाजुला काढुन ठेवण्यात आली.   आता एक वेगळीच गंमत सुरु झाली, हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक पाहुणा त्या हॉटेलचे सौंदर्य पाहुन हरखुन गेला खरा, पण आल्याबरोबर काही क्षणात त्याचे लक्ष मिसिंग टाईलकडेच वारंवार जाऊ लागले. शेकडो लोकांनी एकमेकांना ती मिसिंग टाईल दाखवली, त्याच्यावर ...

समुपदेशन

 "समुपदेशन करताना अनेक अनुभव येतात..बरच काही शिकवून जातात.." कित्येकदा लोकं म्हणतात, "तुझी परीस्थिती मी समजू शकतो..! "मित्रं, नातेवाईक कदाचित सहानुभूती म्हणून असे म्हणू शकतात. त्यावेळी ते योग्यही असेल. पण खरच आपण एखाद्याची स्थिती समजू वा अनुभवू शकतो? बहुतेक नाही.. त्या माणसाच्या मनांत बरंच काही साठलेले असते, त्याला कोणालातरी बरंच काही सांगायचे असते मग अश्यावेळी त्या व्यक्तीला बोलते करणे गरजेचे असते." परीस्थिती समजून घेण्यासाठी माणसाचे मन समजून घेणे" फार महत्वाचे असते, असे मला वाटते..  म्हणूनच, समुपदेशक समोरच्या व्यक्तीच्या मनात साठलेले "मळभ" दूर करायचा प्रयत्न करत असतो, त्याच्या भावनांचा आदर करून त्याचे म्हणणे व्यवस्थित ऐकून मगच त्याला समुपदेशक सोयिस्कर पर्याय किंवा विचारांना नवी दिशा देऊ शकतो.. परीस्थिती बदलण्याची जादू समुपदेशकाकडे नसेलही पण परीस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य तो नक्कीच देऊ शकतो.  अभिजित आपटे