Posts

Showing posts from May, 2022

भारतीय डाक विभागात 38,926 जागांची भरती

  भारतीय डाक विभागात एकूण 38,926 ग्रामीण डाक सेवक (GDS) BPM/ABPM/ डाक सेवक म्हणून नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  अर्ज https://indiapostgdsonline.gov.in. वर ऑनलाइन सबमिट करावयाचा आहे इतर कोणत्याही माध्यमातून सबमिट केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत आणि दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज सबमिट केल्यास अर्ज नाकारला जाईल. ज्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत त्यांचा तपशील जहिरातीमध्ये सविस्तर देलेला आहे. भारतात एकूण जागा : ३८९२६ महाराष्ट्रात एकूण जागा : ३०२६  शैक्षणिक पात्रता : 1. कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10 वि उत्तीर्ण प्रमाणपत्र.  2. सर्व GDS पदांसाठी सायकल चालवणं येणं आवश्यक. जर स्कुटर किंवा मोटारसायकल चालवता असेल तर हे देखील सायकलच्या ज्ञानात समाविष्ट केला जाईल.  वयोमर्यादा :  १८ ते ४० (SC/ST साठी ५ वर्ष सुट, OBC साठी ३ वर्ष सुट) अर्ज शुल्क (Fee) :  100 रुपये. (सर्व-महिला उमेदवार, SC/ST उमेदवार, PWD उमेदवार आणि ट्रान्सवुमन उमेदवारांना अर्जासाठी फी नाही) 'post office...

भारतातील 11 महत्वाचे कामगार कायदे

  भारतातील 11 महत्वाचे कामगार कायदे जे प्रत्येकाला माहित असले पाहिजे. 1) किमान वेतन कायदा नावाप्रमाणेच, हा कायदा तुम्हाला मिळणारे किमान वेतन ठरवतो. तुम्ही कुशल किंवा अकुशल कर्मचारी असाल आणि तुमची स्थिती यानुसार किमान वेतन बदलते. किमान, तुम्ही जे काम करता ते कोणत्या श्रेणीशी निगडित आहे. त्यासाठी तुमच्या राज्यात किमान किती वेतन लागू याची माहिती सांगणारा हा कायदा आहे. 2) वेतन देय कायदा तुम्हाला जर तुमच्या मालकाने किंवा कंपनीने तुमचे वेतन म्हणजे पगार दर महिन्याला द्यायला उशीर केल्यास, हा कायदा तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट, 1936 नुसार, तुमच्या मालकाने तुम्हाला तुमचा पगार दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. हा कायदा तुमच्या पगारातून मिळणाऱ्या कपातीचेही नियमन करतो. 3) मातृत्व लाभ (सुधारणा) कायदा 2017 मध्ये, महिलांसाठी उपलब्ध सशुल्क प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली. जर एखाद्या महिलेने गेल्या 12 महिन्यांत 80 दिवसांपेक्षा जास्त काळ एखाद्या संस्थेत काम केले असेल, तर ती अशा सशुल्क रजेचा लाभ घेण्यास ...