तंत्रसाक्षरता आणि महिला
स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढत असले तरी, डिजिटल जगातला वावर वाढला असला, तरी त्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे. एवढेच नव्हे, तर प्रौढ साक्षर स्त्रिया अजूनही डिजिटल विशिष्ट छोट्या व जुजवी वर्तुळात फिरत आहेत. व्हॉटसअॅप, ई - मेल, मेसेज, नेटवरून माहिती शोधणे वगैरेबाबतही माहिती घेण्यात त्या मागे राहतात. त्याचे कारण उत्सुकता व कल नसणे. दुसरे म्हणजे त्या वस्तू वापराबद्दलची भीती. तिसरे म्हणजे आत्मविश्वास नसणे. डिजिटल अवकाश न विस्तारलेल्या स्त्रियांची संख्या मोठीच आहे. शिक्षण हा व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे आणि त्या विकासात डिजिटल विश्व आणि तंत्र वापर ही अपरिहार्यता आहे ; मात्र जनरल एज्युकेशनमधून अगदी पदवी - पदव्युत्तरपर्यंत सामान्य शिक्षणात डिजिटल प्रशिक्षण व ज्ञान शिकविले जात नाहीच. खरे तर, तसे कौशल्य शिकण्याची आवड व माहिती ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा हवी, ज्याची कमतरता स्त्रियांमध्ये आढळते. नकारात्मक भावना असते त्याबद्दल. कोरोना काळात मुलांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे लिंक पाहणे व पाठवणे, मेसेज करणे, डेटा संपत आल्याची माहिती घेणे, ट्विट पाहणे संवाद साधणे...