Posts

Showing posts from August, 2022

खेळ

मनोरंजन वा शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा. खेळण्याची प्रवृत्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. लहान बालकापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच खेळांची आवड असते. अगदी प्राथमिक अवस्थेतील मानवसमाजातही अनेक प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार, कुस्ती, द्वंद्वे, कवड्या, सोंगट्या, फासे इ. खेळ ते खेळत. प्राचीन ग्रीक लोक अनेक प्रकारचे खेळ खेळत. खेळांना नियमित व सुसंघटित असे स्वरूप ग्रीक लोकांनीच दिले. त्यांच्या जीवनात खेळांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. ग्रीक लोकांच्या वैभवकालात त्यांचे ऑलिंपिक, नेमियन, पायथियन, इस्थमियन इ. नियतकालीन सामने प्रसिद्ध होते. या सामन्यांत भाग घेणे व विजय मिळविणे हे मानाचे समजले जाई. या सामन्यांत धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टीयुद्ध इ. खेळांचा समावेश असे. रोमन लोकांतही खेळांना प्राधान्य होते. आपल्या भारतात प्राचीन वैदिक कालात, तसेच रामायण व महाभारत कालात द्युत, फासे, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती इ. खेळ प्रचलित होते. भारताप्रमाणे ईजिप्त, चीन, जपान इ. देशांतही सोंगट्या, गंजीफा, बुद्धिबळे, शतरंज यांसारखे खेळ फा...

मनाचे चार्जिंग

(अतिशय सुंदर पध्दतीने मन कसं रिचार्ज करायच हे पटवून दिलं आहे अन् पटण्यासारखं आहे.)👇 ---- मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच. रविवार...निवांत, आरामाचा दिवस...आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती.  सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज *'लो बॅटरी * '.. चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती. अरे बापरे...?? काय करावे तेच सुचेना... मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो. *माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”* “नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले. “मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणि चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. *मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतो,इतके त्याला जपतो.. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?”* पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते. “मन...