Posts

Showing posts from March, 2022

'नको विशेषण आता निर्भया'

रोज एखाद दुसरी निर्भया दिसते दैनिकात,येते ऐकिवात तिची 'ती' अवस्था झालेली...... निर्भया कधी कोवळी बाला,कुमारिका,कधी तरुणी तर कधी आईच्या वयाचीही... कधी गरीब,तर कधी चांगल्या घरची, निर्भया, कधी अपंग असते... तर कधी मतिमंदही, तर कधी विधवाही ।। 'ती सुंदर असतेच अस नाही.... पण......  ती " 'स्त्री' असते' त्यांना फक्त कोणतीही स्त्री हवी असते .... आपल्या सामूहिक बलात्कारातून, विकृत ,वासनांध मानसिकतेतून, 'ती' चा बळी घेण्यासाठी ।। सखी,तू आदर्श नारी या देशाची  तू स्वतःच एक शक्तीपीठ  आज माझ्याकडून भेट साऱ्या सख्याना.. .. माझ्या विचारांच्या सज्ज तोफा  ही भेट स्वीकारुन सख्यानो, आपण साऱ्याजणी.... प्रतिकार करु...धिक्कार करु... वासनेच्या भोक्त्यांचे, समाजकंटकी, कलंकी वृत्तीचे उगम, आणि निर्भयांच्या शृंखला ।। रडत बसू बकोस, बळी पडू नकोस, जागरूक हो, आता निडरपणे जगायचं.... पण, निर्भया हे नकोस विशेषण न लावता, 'तू चंडीका हो, नवदुर्गा हो, जिजाऊ हो, झाशीची राणी हो, नराधम असुरांचा.... कर्दनकाळ हो, तू सज्ज हो' ।। रचना:- सौ अश्विनी कुलकर्णी सांगली जागतिक महिला दिनाच्या हार्...